How To Look Beautiful Without Makeup
मेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स! By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 1:32 PM1 / 6सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. परंतु मेकअप न करताही सुंदर दिसणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. 2 / 6बाजारामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. ज्यांचा वापर करून इंस्टंट ग्लो मिळवणं किंवा एखाद्या समारंभासाठी तयार होणं सहज शक्य होतं. परंतु त्या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले केमिकल्स स्किनसाठी हानिकारक ठरतात. 3 / 6तुमच्या डेली रूटीनमध्ये थोडेसे बदल करून तुम्हालाही मेकअपशिवाय सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवणं सहज शक्य आहे. 4 / 6दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिणं आरोग्यासोबतच स्किनसाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर, स्किनही काही दिवसांतच चमकदार होम्यास मदत होते. 5 / 6सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मध एकत्र करून प्यायल्याने पूर्ण दिवस फ्रेश राहण्यास मदत होते. 6 / 6घराबाहेर जाताना चेहऱ्यावर आणि स्किनवर सनस्क्रिन लावायला विसरू नका. कारण त्यामुळे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून स्किनचं रक्षण होण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications