How To Make Neem-Honey facepack at home & its benefits for skin
कडूलिंब आणि मधाचा सोपा फेसपॅक, त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांवर रामबाण उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 3:15 PM1 / 7पिंपल्स, डाग, सुरकुत्या अशा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्रीम आणि लोशनचा उपाय करत असतील. पण प्रत्येकवेळी याचा फायदा होईलच असे नाही. मात्र तुम्ही जर नैसर्गिक पद्धतींचा वापर करून घरगुती उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फरक बघायला मिळेल. 2 / 7कडूलिंब आणि मधाच्या फेसपॅकने तुम्ही तुमच्या त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाचा वापर करणे सर्वात चांगला उपाय मानला जातो. जर तुम्ही कडूलिंबासोबत मधाचा वापर कराल तर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होती. हा फेसपॅक तयार करण्यासाठी ३ ते ४ कडूलिंबाची पाने आणि १ चमचा मध घ्या.3 / 7सर्वातआधी कडूलिंबाची पाने २० मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा. नंतर त्यांना बारीक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात मध मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा. थोड्या वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा. (Image Credit : www.miamiobgyns.com)4 / 7तुम्हाला जर पिंपल्सची समस्या असेल तर बाहेरील औषधांवर भरमसाठ पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाहीय हा फेसपॅक लावून तुमची पिंपल्सची समस्या काही दिवसात दूर होईल. (Image Credit : www.lifetimestyles.com)5 / 7कडूलिंबाची पाने आणि मधाच्या फेसपॅकने त्वचा मुलायम होते. शुष्क त्वचेसाठी हा फेसपॅक फार फायदेशीर ठरतो. 6 / 7शरीरावर कोणत्याही प्रकारचे घाव किंवा जळाल्याचे डाग असतील तर हा फेसपॅक लावू शकता. मधात अनेक नैसर्गिक औषधी गुण आहेत. त्यामुळेच याचा वापर वेगवेगळ्या समस्यांसाठी केला जातो. 7 / 7पिंपल्स किंवा डागांसोबतच तुम्ही या फेसपॅकने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेडपासूनही सुटका मिळवू शकता. या फेसपॅकच्या मदतीने तेलकट त्वचेची समस्याही दूर केली जाऊ शकते. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी आणखी वाचा Subscribe to Notifications