शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोपर काळे झाले म्हणून हात झाकावा लागतोय? 'हे' उपाय करून काळपटपणा कायमचा होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 3:15 PM

1 / 10
वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही परिणामी त्वचा टॅन होते. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपली त्वचा सुंदर, गोरी आणि चमकदार असावी. पण काळपटपणामुळे आपल्याला खूप ऑकवर्ड फिल होत असतं. आपल्याला स्लिव्हलेज सुद्धा घालता येत नाही.
2 / 10
तुम्ही सुद्धा याच समस्येने हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
3 / 10
आपण लिंबाचा वापर करताना रस काढून साल फेकून देत असतो. पण कुठल्याही महागड्या फळाप्रमाणे लिंबाचं आणि संत्र्याचं साल सुद्धा त्वचेसाठी फायद्याचं असतं. त्वचेच्या काळ्या झालेल्या भागांना म्हणजेच गुडघे आणि कोपरांना जर तुम्ही लिंबाचं साल चोळाल तर त्वचा चांगली राहील. त्यासाठी लिंबाच्या सालीवर साखरेचे कण टाकून साल कोपरांना चोळा.
4 / 10
कढीपत्त्याचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता. त्यासाठी कढीपत्त्याची पानं वाटून बेसनाच्या पीठात घाला. त्यानंतर कोपरांना लावा. २० मिनिटांनी कोपर स्वच्छ पाण्याने धुवा.
5 / 10
हळदीचे सौंदर्याच्या दृष्टीने असलेले फायदे आपल्याला माहीत असतील. हळदीमध्ये दुधाची साय आणि चण्याचं पीठ घालून गुडघ्यांना लावा. १० मिनिटांनी धुवून टाका दररोज हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली दिसेल.
6 / 10
मधाचा वापर करून सुद्धा तुम्ही त्वचेचा काळपटपणा घालवू शकता. त्यासाठी दूध,मध आणि हळद एकत्र करून गुडघा आणि कोपरांना लावा.
7 / 10
केशर सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर असतं. काळपटपणा काढून टाकण्यासाठी केशराचा वापर केला जातो. केशराच दुध आणि राईचं तेल घालून तुम्ही त्वचेला लावाल तर नक्कीच फरक दिसून येईल.
8 / 10
एलोवेराचे आरोग्यवर्धक फायदे आपल्याला माहीत आहेत. त्वचेसाठी सुद्धा एलोवेरा फायदेशीर आहे. त्यासाठी एलोवेराचा ज्यूस काढून त्वचेवर लावा. सलग एक आठवडा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
9 / 10
बेसनाचा वापर स्क्रब म्हणून करून त्वचेवरील मृत पेशी हटविता येतात. ह्या साठी तीन चमचे बेसनामध्ये एक चमचा ओट्स घालून, त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोर आणि आवश्यकतेप्रमाणे दुध घालावे. हे मिश्रण हळुवार हाताने चोळत कोपर आणि गुडघ्यांना लावावे. दहा मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर राहू देऊन त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकावा.
10 / 10
मुलतानी मातीचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. कोपरांचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही दोन चमचे मुलतानी माती त्यात एक मोठा चमचा टॉमेटो रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घाला. आता हा पॅक आपल्या काळया असलेल्या भागांवर लावा. नंतर मसाज करून कोपर धुवून टाका.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स