How take care of lips in easiest way
ओठ फाटल्यामुळे लूक बिघडतोय? तर ओठांची काळजी घेण्यासाठी वापरा 'हे' उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 6:08 PM1 / 6आपल्या ओठांचे सौंदर्य बिघडवण्यासाठी वातावरणातील काही घटक जबाबदार असतात. तसंच आपण रोजच्या जगण्यात अनेक चुका करत असतो त्यामुळे काळे पडण्याची आणि कोरडे पडण्याची समस्या जाणवत असते. जर ओठ सुंदर असतील लूक चांगला दिसत असतो. 2 / 6जर तुम्हाला स्वतःचे ओठ सुंदर ठेवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वतःच्या ओठांची काळजी घेऊ शकता. 3 / 6लिप लायनर, लिपस्टिक लावल्याने ओठांचा ओलावा नष्ट होतो. त्यामुळे ओठांचं फाटणं थांबवायचं असेल तर ही उत्पादने वापरणे कमी करावे. जर उत्पादनांमध्ये अल्कोहोल असेल तर अशी उत्पादने दूरच ठेवा. तसंच बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचं प्रमाण कमी ठेवा.4 / 6ओठांवर पुन्हा पुन्हा हात लावल्याने ते कोरडे होणे, सूज येणे आणि खाज येणे या समस्या होतात. तसेच ओठांवर पुन्हा पुन्हा जिभ फिरवल्यानेही ओठांना कोरडेपणा येतो. ओठांची त्वचा ही तीन थरांची असते आणि ती सतत जिभ लावल्याने कोरडी होते. 5 / 6ओठांवर वेगळं सलस्क्रीन लोशन लावा. याने केवळ त्वचेला कोमलता नाही तर सुरक्षाही मिळेल. सनस्क्रीन लावून उन्हात गेल्यावर ओठ फाटणार नाहीत. 6 / 6व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी 2 असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करा. तसंच फास्टफूडचा आहार घेणं टाळा त्यामुळे तुमच्या त्वचेसह ओठसुद्धा खराब होऊ शकतात. तळलेले, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नका. त्यामुळे ओठ खराब होण्याची शक्यता असते. आणखी वाचा Subscribe to Notifications