शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेकअपशिवायही सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा 'या' टिप्स, नॅच्युरल लूकसाठी परफेक्ट गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:15 AM

1 / 9
सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. परंतु मेकअप न करताही सुंदर दिसणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे.
2 / 9
बाजारामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. ज्यांचा वापर करून इंस्टंट ग्लो मिळवणं किंवा एखाद्या समारंभासाठी तयार होणं सहज शक्य होतं. परंतु त्या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले केमिकल्स स्किनसाठी हानिकारक ठरतात.
3 / 9
तुमच्या डेली रूटीनमध्ये थोडेसे बदल करून तुम्हालाही मेकअपशिवाय सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवणं सहज शक्य आहे.
4 / 9
दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिणं आरोग्यासोबतच स्किनसाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर, स्किनही काही दिवसांतच चमकदार होण्यास मदत होते.
5 / 9
सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मध एकत्र करून प्यायल्याने पूर्ण दिवस फ्रेश राहण्यास मदत होते.
6 / 9
घराबाहेर जाताना चेहऱ्यावर आणि स्किनवर सनस्क्रिन लावायला विसरू नका. कारण त्यामुळे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून स्किनचं रक्षण होण्यास मदत होते.
7 / 9
चेहरा नियमित पाण्याने धुतला तरी सुद्धा चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसू शकतो. तसेच त्वचेवरील तेलही दूर होतं. अशात तुम्हाला नॅच्युरल लूक मिळू शकतो.
8 / 9
पुरेशी झोप घेणं हे सुंदर दिसण्यासाठी किंवा फ्रेश दिसण्यासाठी महत्वाचं आहे. पुरेशी झोप झालेली नसेल तर तुम्ही किती मेकअप करा चेहरा तजेलदार वाटणार नाही.
9 / 9
नियमित फळं खाणं हे आरोग्यासोबत त्वचेसाठीही अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. वेगवेगळी फळं खाल्ल्याने चेहरा खुलतो आणि तजेलदार दिसतो.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स