-Ravindra Moreजर आपले केस मध्यम आकाराचे आहेत तर आपण कित्येक प्रकारच्या हेअरस्टाइल्स काही मिनिटातच करु शकता. आपण आपल्या केसांना ओपन वाइड ठेवू शकता किंवा लहानसा बदल करु शकता ते आपल्यावर अवलंबून आहे. हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाइल करुन फॅशनेबल दिसू शकता, याबाबत आजच्या सदरात ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...बाऊंसी विंटर हेअरस्टाइलआपल्या मध्यम आकाराच्या केसांना हिवाळ्यात बाऊंसी हेअरस्टाइल करुन एक वेगळा लूक देऊ शकता. यात आपण केसांना सोनेरी रंगाची छटा देऊन चमकवू शकता तसेच केसांची लांबी खांद्यापर्यंत ठेवून आकर्षक वेगवेगळ्या फॅशनेबल स्टाइल करु शकता. मेसी अपडू साइड स्वेप्ट या हेअरस्टाइलने आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसू शकते. ज्यांना हिवाळ्यात पार्टीमध्ये जायचे असेल त्यांनी मेसी अपडू साइड स्वेप्ट हेअरस्टाइल करावी. यात आपण सुंदर तर दिसणारच शिवाय आपल्याकडे सर्वांच्या नजरा एकवटतील. मध्यम आकाराचे दाट भुरे केसयात काळ्या रंगाच्या केसांवर हलक्या भुºया रंगाची हायलाइट्स केली जाते. तसेच केसांची लांबी खांद्यापासून थोडी वरपर्यंत असते. ही एक सामान्य प्रकारची हेअरस्टाइल असून हिवाळ्यात खूपच सुंदर दिसते. मध्यम आकाराचे लेयरयुक्त केसजास्तीत जास्त महिला सध्या केसांना लेयर्ड कट करणे पसंद करतात, कारण ही हेअरस्टाइल खूपच सुरक्षित आहे आणि विशेष म्हणजे सर्वांनाच आकर्षकदेखील वाटते. अजून आकर्षकता येणासाठी आपण हायलाइटिंग करु शकता. मेसी फ्लो मध्यम लेंथ हेअरआपली हेअरस्टाईल आकर्षक बनविण्यासोबतच सूट करणारे फॅशनेबल ड्रेस परिधान केले तर मध्यम आकाराचे केस खूपच सुंंदर वाटतील. यात आपण मल्टीपल स्वेप्टचा प्रयोग करुन आकर्षक लूक प्राप्त करू शकता. साइड स्वेप्ट ब्लोंड मीडियम हेअरयात आपण ब्लंट कट करून साइड स्वेप्ट हेअरस्टाइलच्या मदतीने एक आगळावेगळा लूक मिळवू शकता. सुंदर दिसण्यासाठी महिला या हेअरस्टाइलचा वापर करु शकतात. ही खूपच सोपी आणि शानदार हेअरस्टाइल आणि एक लॉन्ग बॉब आहे ज्याचा वापर आपण हिवाळ्यात करु शकता. वेट लूक हेअरस्टाइलवेट लूक हेअरस्टाइल सध्या खूपच प्रचलित आहे. ज्या हेअरस्टाइलमुळे गर्दीतही आपले व्यक्तिमत्त्व उठावदार दिसेल अशा हेअरस्टाइलच्या शोधात जास्तीत जास्त महिला असतात. जेव्हा आपण गर्दीत असाल तेव्हा मात्र आपण ही हेअरस्टाइल करुन एक खास लूक प्रदान करु शकता. जर आपणास सकाळी बाहेर फिरायला जायचे असेल तेव्हा आपण आंघोळ केल्यानंतर लगेच ही हेअरस्टाइल करु शकता. हिवाळ्यातील सोनेरी वेव्सआपण आपल्या सोनेरी केसांना चांगल्या वेव्स्चा प्रयोग करु शकता. कारण ही स्टाइल करुन हिवाळ्यात केसांना मोकळे सोडायला काही हरकत नाही. विशेष म्हणजे ही स्टाइल दिवसा आणि रात्री बऱ्याच वेळापर्यंत आपण ठेवू शकता.