lifestyle use lemon as natural bleach for fair skin home remedy
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी 'हा' आहे सर्वात स्वस्त उपाय, असा करा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 2:48 PM1 / 7उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या दिवसांत त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवणं थोडं कठीण काम असतं. लिंबू हे एक असं फळ आहे जे खाल्लं अथवा त्वचेवर लावलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 2 / 7घरी तयार करण्यात आलेले लिंबू सरबत प्यायल्यास बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. तसेच त्वचेवर लिंबू लावल्यास रंग उजळण्यास मदत होते. 3 / 7लिंबूमध्ये अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड्स असतं जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतं. तसेच त्यामध्ये असलेले ब्लीचिंग एजेंट्स काळे दाग दूर करण्यास मदत करतात.4 / 7लिंबू, साखर आणि ऑलिव ऑइल स्क्रबप्रमाणे लावा. यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाऊन एक ग्लो येण्यास मदत होईल. 5 / 7डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी लिंबू आणि ऑलिव ऑइल एकत्रित करून रात्री झोपताना डार्क सर्कल्सवर लावा. यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. 6 / 7अॅलोवेरा, पपई याचा प्लपमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून फेसपॅक तयार करता येतो. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास रंग उजळण्यास मदत होते. लिंबूमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. 7 / 71 चमचा दही, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करून 20 मिनिटं त्वचेवर लावा. नॅचरल ब्लीचप्रमाणे हे काम करेल. टिप : वरील केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications