शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता ऑयली स्किनला करा बाय-बाय; 'हे' 7 घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 2:57 PM

1 / 8
पावसाळ्यामध्ये त्वचेचा तेलकटपणा तसेच चिपचिपितपणा जास्त वाढतो. त्यामुळे या वातावरणामध्ये तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. एक तर चेहऱ्याची तेलकट होणारी त्वचा आणि दुसरी म्हणजे, पावसामुळे होणारा चिकटपणा यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. या समस्या कमी करण्यासाठी मान्सूनमध्ये काही खास फेस पॅक ट्राय करा. जाणून घ्या फेसपॅक तयार करण्याची आणि वापरण्याची पद्धत...
2 / 8
एका छोट्या बाउलमध्ये 3 चमचे तांदळाचे पिठ घेऊन त्यामध्ये एक चिमुटभर हळद, एक चमचा मध आणि थोडासा काकडीचा रस एकत्र करा. सर्व पदार्थ एकत्र करण्यासाठी गरजेनुसार, गुलाब पाणी एकत्र करा. हा फेस पॅक चेहऱ्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांवरही लावू शकता.
3 / 8
बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी साल काढून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. तयार पेस्टमध्ये एक चमचा मध एकत्र करा. फेसपॅक तयार आहे.
4 / 8
तीन चमचे ऑरेंज पल्प म्हणजेच, संत्र्याचा गर घ्या. त्यामध्ये दोन चमचे दूध आणि तीन चमचे कडुलिंबाची पेस्ट एकत्र करा. दोन्ही व्यवस्थित एकत्र केल्यानंतर चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. फेसपॅकमध्ये असलेलं संत्री आणि कडुलिंब दोन्ही त्वचेवरील तेल काढून टाकण्यासाठी मदत करतात.
5 / 8
2 चमचे बेसन, 3 चमचे संत्र्याचा गर आणि गुलाब पाणी व्यवस्थित एकत्र करा. घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. फेसपॅकमध्ये असलेलं संत्री आणि बेसन दोन्ही त्वचेवरील ऑिल दूर करतं आणि त्वचेवरील घाणही दूर करतं.
6 / 8
मुलतानी मातीमध्ये असणारी पोषक तत्व तेलकट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यापासून तयार केलेला फेसपॅख त्वचेवरील तेल शोषून घेऊन नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतो. दोन चमचे मुलतानी माती, एक चमचा दही, दोन ते तीन थेंब लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हे थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून तीन वेळा हा फेसपॅक वापरा.
7 / 8
मसूरची डाळ फक्त खाण्यासाठीच नाहीतर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये आढळून येणारी खनिज तत्व आणि व्हिटॅमिन्स तेलकट त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यापासून फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धा कप मसूरची डाळ, कच्चं दूध एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावून थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
8 / 8
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स