शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दाढी, मिशांचे केस काळे करण्यासाठी डाय कशाला, फक्त वापरा 'हे' सोपे नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 2:46 PM

1 / 10
प्रत्येक पुरूषाचे व्यक्तीमत्व हे त्याच्या राहणीमानावरून आणि सगळयात महत्वाचं दाढी आणि मिशा यांमुळे आकर्षक दिसत असतं. चेहरा चांगला दिसण्यामागे दाढी सुद्धा महत्वाची असते. काळे केस सगळ्यांनाच आवडत असतात. पण बदलत्या वातावरणात प्रदुषणामुळे आणि जीवनशैली अनियमीत असल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांच्या समस्येचा सामना मोठ्या प्रमाणावर पुरूषांना करावा लागतो.
2 / 10
काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही आपले केस चांगले ठेवू शकता. तुमच्या घरात आधीच उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून तुम्ही केस आणि दाढी चांगली ठेवू शकता.
3 / 10
आवळा : आवळ्याचे गुणधर्म विविध रोगांवर गुणकारी आहेत. आवळयाचा वापर तुम्ही नारळाच्या तेलासोबत करून अनेक फायदे मिळवू शकता. नारळाच्या तेलात आवळा घालून उकळून घ्या. हे तेल रोज दाढीच्या केसांना लावा.
4 / 10
तूप : तूपाने त्वचेला आणि आरोग्याला पोषण मिळत हे आल्याला माहित असतं. त्यासाठी गाईच्या तुपाने दाढीच्या केसांची मसाज करा. नंतर १० ते १५ मिनिटांनी केस धुवून टाका हा प्रयोग तुम्ही सतत १ आठवडा कराल तर फरक दिसून येईल. दाढीच्या आणि मिशीच्या केसांची वाढ चांगली होईल.
5 / 10
कढीपत्ता आणि नारळाच तेलं: नारळाच्या तेलाचे केसांसाठी असलेले फायदे तुम्हाला माहित असतील. यासाठी नारळाच्या तेलात कढीपत्ता घासून १० मिनिटं उकळू द्या. नंतर हे तेल थंड होऊ द्या. रोज हे तेल आपल्या दाढी आणि मिशांना लावल्यानं फरक दिसून येईल.
6 / 10
पपई आणि एलोवेरा :पपई आणि एलोवेराचा वापर करून तुम्ही तुमच्या दाढीचे आणि मिशीचे केस काढे करू शकता. पपई आणि एलोवेरामध्ये झिंक सारखे पोषक तत्व असतात. त्यासाठी पपईची पेस्ट तयार करून त्यात एक चमचा हळद आणि एक चमचा एलोवेरा घाला. हे मिश्रण केसांना लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. हा प्रयोग सतत २ आठवडे केल्यास फरक दिसून येईल.
7 / 10
आळशीच्या बीया : आळशीच्या बीया खाल्लाने सुद्धा तुमची दाढी आणि मिशी चांगली दिसेल. कराण आळशीच्या बीयांमध्ये प्रोटिन्सचं प्रमाण अधिक असतं. प्रोटिन हे केसांना दाट आणि काळे बनवण्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आळशीच्या बीया खाणं फायदेशीर ठरेल.
8 / 10
पुदिना: पुदिना ही एक औषधी वनस्पती आहे. तुम्ही पुदिन्याचा समावेश चहात करून पुदिन्याच्या चहाचे सेवन केले तर दाढीचे केस चांगले राहण्यासाठी उत्तम ठरेल. पुदिन्यामुळे त्वचेवरील पोर्स ओपन होऊन केसांची वाढ चांगली होते.
9 / 10

10 / 10

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स