side effects of selfie on skin and health
सेल्फीचे साईड इफेक्ट्स ! धोके वाचाल, तर सेल्फीला राम राम कराल By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 5:37 PM1 / 7माणसाच्या व्यक्तीमत्वात चेहऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं अनेकांना वाटतं. सेल्फी काढण्याच्या सवयीचा थेट परिणाम माणसाच्या चेहऱ्यावरच होतो.2 / 7सेल्फी काढताना मोबाईलमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात. हे त्वचेसाठी हानीकारक असतात. 3 / 7सेल्फी काढताना निघणाऱ्या रेडिएशन सनस्क्रीनदेखील रोखू शकत नाहीत. रेडिएशन थेट चेहऱ्यावर येत असल्यानं त्वचेवर विपरित परिणाम होतो. 4 / 7सेल्फी काढताना मोबाईलमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. तुमची त्वचेचं वय वाढतं. त्यामुळे तुम्ही म्हातारे होत आहात, असं वाटू लागतं. 5 / 7मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम त्वचेतील डीएनएवरदेखील होतो. पेशींच्या पुनरुज्जीवन क्षमतेवर रेडिएशनचा अतिशय प्रतिकूल परिणाम होतो.6 / 7त्वचेवरील पेशी ठराविक कालावधीनंतर मृत पावतात. त्यानंतर त्याच जागी नव्या पेशी येतात. या प्रक्रियेमुळे त्वचेचा तजेला कायम राहतो. या प्रक्रियेला पेशींचं पुनरुज्जीवन म्हणतात. सेल्फीच्या अतिरेकामुळे या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतात. 7 / 7सेल्फीमुळे अनेक आठवणी टिपता येतात. पण त्याला काही मर्यादा असावी. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. आणखी वाचा Subscribe to Notifications