Summer skincare tips use these 7 natural products to cure skin problem
उन्हाळ्यामधील त्वचेच्या समस्यांनी हैराण आहात?; या 7 गोष्टी वापरून पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 12:16 PM1 / 10उन्हाळ्यामध्ये त्वचेशी निगडीत समस्यांचा सर्वात जास्त धोका असतो. प्रखर ऊन आणि घामामुळे या वातावरणात सन टॅन, फंगल इन्फेक्शन, घामोळ्या आणि खाज यांसारख्या समस्या होणं साधारण गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही प्रकराचं स्किन इन्फेक्शन आणि त्यावरील उपचारांमध्ये साफ-सफाई, खानपान आणि जीवनशैली महत्वाची भूमिका पार पाडते. तुम्ही याकडे जराही दुर्लक्षं केलं तरिही या समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो. 2 / 10तसं पाहायला गेलं तर त्वचेच्या समस्यांवर उपचार म्हणून अनेक उपाय करण्यात येतात. परंतु अनेक घरगुती उपचारांमार्फतही तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. 3 / 10चंदन पावडरमध्ये क्लींजिंग गुणधर्म असतात. जर दूध किंवा गुलाब पाण्यासोबत एकत्र करून लावल्याने डाग दूर करण्यासाठी मदत मिळते. याचसोबत तुम्हाला चंदन पावडर, दूध, गुलाब पाणी आवश्यक असतं. सर्वात आधी चंदन पावडर दूध किंवा गुलाब पाण्यासोबत एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर अर्ध्या तासासाठी लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. 4 / 10बदामाचा फेस पॅक तयार करण्यासाठी बदाम आणि गुलाब पाण्याची गरज आहे. 2 ते 3 बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवून रात्रभर तसचं ठेवा. त्यांची साल काढून बदाम बारिक करूम त्यामध्ये गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 5 / 10फेस पॅक तयार करण्यासाठी मध, ओट्स आणि कोरफडीचा गर एकत्र करा. सर्वात आधी मध, ओट्स आणि कोरफडीचा गर मिक्सरमध्ये ब्लेंड करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटांसाठी तसचं ठेवा. 30 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 6 / 10 लिंबाचा रस काढून त्वचेवर लावा. जर तुम्हाला चेहऱ्यावर लावायचा असेल तर कॉटन बॉल्सचा वापर करा. हे 10 ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंत नॉर्मल पाण्याने हे स्वच्छ करा. उत्तम रिझल्टसाठी तुम्ही दिवसातून 3 वेळा याचा वापर करू शकता. 7 / 10उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंब अत्यंत फायदेशीर ठरतो. पिंपल्स, घामोळ्या यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. त्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी. 8 / 10उन्हाळ्यामध्ये घाम बॅक्टेरिया आणि तेल एकत्र आल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. असं त्वचेची रोमछिद्र बंद झाल्यामुळे होतं. खासकरून ऑयली स्किन असणाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये एक चमचा सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करून पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. 9 / 10चेहऱ्यावरील अॅक्ने किंवा डाग दूर करण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो. हार्मोन्स परिवर्तन आणि तणावामुळे चेहऱ्यावर जे गडद डाग तयार होतात. त्यावर उपचार करणं अत्यंत अवघड असतं. हे निशान महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही सफरचंदाचं व्हिनेगर पाण्यामध्ये एकत्र करून वापरू शकता. 10 / 10टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications