Summer Special Dahi or yogurt face mask for dry skin know how to make and apply
उन्हाळ्यात कोरड्या त्वचेसाठी बेस्ट ऑप्शन दही फेसपॅक; असा करा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:15 PM1 / 8जर तुमची स्किन ड्राय होत असेल तर त्यावर बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करून आणखी नुकसान पोहोचवू नका. मग आता यासाठी कय करू याचाच विचार करताय ना? ड्राय स्किनवर उपाय करण्यासाठी घरीच पपई, केळी किंवा मध एकत्र करून त्याचा फेस मास्क चेहऱ्यावर लावू शकता. पण त्याहीपेक्षा दह्यापासून तयार केलेला फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. 2 / 8दही फक्त त्वचेमध्ये मॉयश्चर लॉक करण्याचं काम करत नाही तर कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.3 / 8दही एक नॅचरल ब्लिचिंग एजेंटही आहे. एवढचं नाही तर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठीही मदत करतो. 4 / 8दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. जे डेड स्किन सेल्स काढून रोम छिद्र म्हणजेच, ओपन पोर्सची समस्या दूर करतं. यामुळे पोर्समध्ये घाण जमा होत नाही तसेच त्वचेमध्ये मॉयश्चर टिकून राहतं. यामुळे ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेल्डही होत नाहीत. 5 / 8दही रिंकल्स म्हणजेच सुरकुत्या दूर करण्यासाठी मदत करतं. 6 / 8दह्याचा फेस मास्क तयार करण्यासाठी दही आणि मध आवश्यक ठरतं. एक कप दह्यामध्ये 3 चमचे मध एकत्र करा. तयार मास्क संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. 7 / 83 ते 4 चमचे दह्यामध्ये ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 8 / 8टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications