These mistakes avoid while using sunscreen
सनस्क्रीन वापरताना 'या' चुका टाळा, तुम्हाला त्रास देणार नाही उन्हाळा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:42 PM1 / 6उन्हाळा आला की, अनेकजण उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात. याने उन्हाळ्यात घराबाहेर जाताना त्वचेचं सुरक्षा होते. त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने त्वचा सैल होणे, ड्राय आणि डॅमेज होणे या समस्यांपासून बचाव होतो. केवळ सनस्क्रीन लावून त्वचेची सुरक्षा होते असे नाही तर त्यासाठी सनस्क्रीन लावताना केल्या जाणाऱ्या काही चुकाही टाळाव्या लागतात. चला जाणून घेऊ काय आहेत त्या चुका. (Image Credit : www.healthywomen.org)2 / 6१) योग्य वेळ - सामान्यपणे लोक घरातून बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करतात. पण असं करु नये. कधीही बाहेर उन्हात जाण्याचा प्लॅन असेल तर बाहेर पडण्याच्या साधारण १० ते १५ मिनिट आधीच सनस्क्रीनचा वापर करा. असं केल्याने सनस्क्रीनला त्याचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि नंतर याने तुमचा उन्हापासून चांगला बचावही होतो. 3 / 6२) केवळ एकदा लावणे - अनेकांना असं वाटतं की, दिवसतातून केवळ एकदाच सनस्क्रीनचा वापर करणं पुरेसं आहे. तुम्हीही असं करत असाल तर हे चूक आहे. सनस्क्रीन दोन ते तीन तासांनी पुन्हा लावायला पाहिजे. हेही लक्षात ठेवा की, स्वीमिंग आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर सनस्क्रीनचा त्वचेवर वापर आवर्जून करावा. (Image Credit : www.cosmeticsdesign.com)4 / 6३) केवळ उन्हात वापरा - जास्तीत जास्त लोकांना असं वाटत असतं की, सनस्क्रीन केवळ उन्हातच त्वचेची सुरक्षा करते. कोणतही वातावरण असो घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीनचा वापर करा. कारण सनस्क्रीन कोणत्याही वातावरणात आपल्या त्वचेची सुरक्षा करतं. (Image Credit : stylecaster.com) 5 / 6४) डार्क त्वचेवर न वापरणं - डार्क त्वचा असलेल्या अनेक लोकांना वाटतं की, त्याना सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही. पण असं नाहीये. कारण सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे स्कीनच्या कोणत्याही टोनसाठी उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर होणं गरजेचं आहे. (Image Credit : www.realsimple.com)6 / 6५) एसपीएफची काळजी - सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण एसपीएफ सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हे एक रेटींग फॅक्टर आहे जे सांगतं की, कोणतं सनस्क्रीन किंवा सनब्लॉक तुमचा कोणत्या स्तरापर्यंत बचाव करतं. (Image Credit : www.elitedaily.com) आणखी वाचा Subscribe to Notifications