शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झटपट सौंदर्य खुलवणाऱ्या ब्युटी टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:45 AM

1 / 7
प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. त्यासाठी त्या अनेक प्रयत्न करत असतात. पार्लरमधील महागड्या ट्रिटमेंट्सपासून ते बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सपर्यंत त्या सर्व काही वापरून पाहतात. पण असं आवश्यक नाही की, सुंदर दिसण्यासाठी नेहमी मेकअपचाच आधार घ्यावा. त्वचा तजेलदार आणि मुलायम दिसल्यामुळेही तुमचं सौंदर्यात भर पडते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही ब्युटी हॅक्स वापरूनही तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलवू शकता.
2 / 7
तुम्हाला तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तुमच्याकडे वेळ नसेल तर त्यावरही काही उपाय असतात. त्यांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. तुम्हाला जर फेस मास्क लावून काही वेळासाठी बसून राहणं शक्य नसेल तर तुम्ही त्याऐवजी शीट मास्कचा वापर करू शकता. हे मास्क तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी लावणं गरजेचं असतं. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. (Image Credit : UNIQSO)
3 / 7
आता तुम्ही म्हणाल की, उशीचा कव्हरचा आणि त्वचेच्या सौंदर्याचा काय संबंध? खरं तर उशीच्या कव्हरवरील बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर चिकटतात आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या होतात. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा उशीचा कव्हर बदला. असं केल्याने पिंपल्सपासून सुटका होण्यास मदत होते. (Image Credit : HuffPost)
4 / 7
उशीच्या कव्हरनंतर तुम्हाला तुमच्या फोनची काळजी घेणं आवश्यक असतं. आपला फोन आपल्यासोबत दिवसभर असतोच पण रात्रीही असतो. वातावरणातील बॅक्टेरिया फोनवरही जमा होतात. फोनचा वापर करताना ते आपल्या त्वचेवर चिकटतात. त्यामुळे फोन सॅनिटायझरच्या मदतीने स्वच्छ करा. याव्यतिरिक्त फोनवर बोलताना आपल्या त्वचेला स्किनपासून दूर ठेवा.
5 / 7
स्किन ग्लो करण्यासाठी आणि स्किन पोर्स स्वच्छ ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करायला विसरू नका. जर तुम्ही असं करताना कंटाळा करत असाल तर वेट वाइप्सच्या मदतीने मेकअप हटवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचाही वापर करू शकता. त्यासाठी खोबऱ्याचे तेल कॉटनवर घेऊन त्याने मेकअप काढून टाका. खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
6 / 7
टाइम आणि एनर्जी वाचवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे ड्राय शॅम्पू. ड्राय शॅम्पू केसांना वॉल्यूम आणि टेक्चर देतं असून केसांवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठीही मदत करतं. (Image Credit : Matrix)
7 / 7
ब्युटी टिप्समधील सर्वात महत्त्वाचा आणि परिणामकारक उपाय म्हणजे, पाणी. भरपूर पाणी प्यायल्याने स्किन डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. तसेच त्वचेवर नैसर्गिक उजाळाही येतो.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी