Tips for long and shine hair
केस सुंदर करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत! By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 7:40 PM1 / 5सौंदर्यात भर पाडण्यासाठी केसांची फार मोठी भूमिका असते. अनेक महिला मोठे केस ठेवणं पसंत करतात. तसेच त्या अनेक वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स करत असतात. अशातच लांब केसांमध्ये हेअरस्टाइल्स करणं अत्यंत सोपं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केस लांब आणि हेल्दी ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत. 2 / 5जर तुम्ही केसांना लांब आणि हेल्दी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी योग्य देखरेख अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे वाढणाऱ्या केसांना काही दिवसांनी ट्रिम करणं आवश्यक असतं.3 / 5जर तुम्ही केसांसाठी शॅम्पूचा वापर करत असाल तर त्यामुळे तुमचे केस स्वच्छ राहण्यास मदत होते. पम तुम्हला माहीत आहे का? शॅम्पू डोक्याच्या त्वचेवरील पोषक तत्वांसोबतच तेल नष्ट करण्यासाठीही मदत करतं. 4 / 5केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तसेच ते लांब आणि सुंदर करण्यासाठी केसांना जास्तीत जास्त खनिजं आणि प्रोटीन्सची आवश्यकता असते. 5 / 5आपण नेहमी पाहतो की, केस धुतल्यानंतर महिला आपल्या ओल्या केसांना टॉवेल गुंडाळतात. यामुळे केस कमजोर होऊन तुटतात. त्यामुळे ओले केस गुंडाळून ठेवण्याऐवजी मोकळे सोडा. आणखी वाचा Subscribe to Notifications