Why blush is important part of beauty box or makeup kit
...म्हणून प्रत्येक महिलेच्या ब्युटी किटमध्ये ब्लश असणं गरजेचं! By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:58 AM1 / 7जेव्हा मेकअप प्रोडक्ट्सबाबत बोललं जातं, तेव्हा ब्लश एक असं प्रोडक्ट आहे, ज्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. जास्तीत जास्त महिलांना ब्लशबाबतच्या काही खास गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे ते ब्लश सहज इग्नोर करतात. अनेकजणींच्या मेकअप किटमध्ये ब्लश असतचं नाही. जाणून घेऊया मेकअप करताना ब्लश का गरजेचं असतं त्याबाबत... 2 / 7प्रत्येकाचं बोन स्ट्रक्चर मॉडल्सप्रमाणे नसतं. परंतु याचा अर्थ असा नाही होत की, तुम्ही हे आपण करेक्ट करू शकत नाही. यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर, तुमची मदत ब्लश करेल. हलकसं ब्लश किंवा हायलायटर लावून तुम्ही चीकबोन्स हायलाइट करू शकता. 3 / 7मेकअपचा एक रूल आहे की, डोळे किंवा लिप्स दोघांपैकी एक गोष्ट हायलाइट करणं. परंतु तुम्ही या दोन्ही गोष्टी सोडून फक्त तुमचे गाल हायलाइट करा. मग पाहा कमाल. त्यासाठी तुम्ही रोज-पिंक, कोरल किंवा ऑरेंज शेड्सचा वापर करू शकता. 4 / 7जर तुमचा रंग गोरा असेल तर तुम्ही हलक्या शेड्सच्या ब्लशची निवड करू शकता. यामुळे तुम्हाला नॅचरल लूक मिळण्यास मदत होते. पीच आणि लाइट कोरल कलरही तुम्ही सिलेक्ट करू शकता.5 / 7जर तुमचा स्किन टोन सावळा असेल तर तुम्ही लाइट कलर्सच्या ब्लशची निवड करू शकता. तुम्ही मॅट पिंकपासून मॉव अंडर टोन,डीप बेरी पिंक आणि हलकसं रेड ब्लश ट्राय करू शकता. 6 / 7जर तुमचा स्किन टोन डार्क असेल तर रेड, ऑरेंज, प्लम किंवा ब्राउन यांसारख्या शेड्सची निवड करू शकता. लक्षात ठेवा की, ब्लश जास्त ओव्हर दिसू नयेत. यामध्ये हलकं शिमर अॅड करू शकता. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लूक मिळण्यास मदत होईल. 7 / 7टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications