शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यात कोणत्या तेलाने बॉडी मसाज करणं ठरतं फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 3:07 PM

1 / 10
थंडीमध्ये शरीरासोबतच त्वचेचीही विशेष काळजी घेण्याची गरज असते. अनेकदा तुमच्या मनातही अनेक प्रश्न येत असतील की, नक्की बॉडी मसाजसाठी कोणत्या तेलाचा वापर करावा. हिवाळ्यात बॉडी मसाज करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस बॉडी मसाज केल्याने त्वचेसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. (Image Credit : The Beauty Academy)
2 / 10
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही असा दावाही करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
3 / 10
बॉडी मसाजसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. शरीराला होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठीही हे तेल मदत करतं.
4 / 10
बदामाचं तेल केसांसोबतच त्वचा आणि आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी हे तेल फायदेशीर ठरतं. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर हे तेल तुमच्यासाठी वरदान ठरेल.
5 / 10
बॉडी मसाज करण्यासाठी आणि स्नायूंच्या वेदना दूर करण्यासाठी हे तेल अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच हाडांसाठीही मोहरीचं तेल फायदेशीर ठरतं.
6 / 10
खोबऱ्याचं तेल आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी गुणकारी ठरतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हे तेल त्वचेला पोषण देण्यासोबतच मुलायम करण्यासाठी मदत करतं.
7 / 10
हे तेल त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतं. त्वचेच्या समस्यां दूर करण्यासाठीही हे तेल मदत करतं. तसेच त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरतं.
8 / 10
हे तेल कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. या तेलामुळे अॅलर्जी होत नाही आणि त्वचेच्या समस्याही दूर होतात. जर तुम्हाला नितळ त्वचा पाहिजे असेल तर या तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरतं.
9 / 10
या तेलामध्ये अनेक पोषत्वांचा समावेश असतो. जे आपल्या त्वचेसाठी उत्तम ठरतात.
10 / 10
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही असा दावाही करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी