शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संतापजनक ! चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञाताने फोडला; हजारो लिटर पाणी गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 1:40 PM

1 / 8
मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने तलावातील साठा कमी झाला आहे. उन्हाळ्यात या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
2 / 8
यंदा बालाघाट डोंगर पट्ट्यात सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे चाटगाव येथील तलाव ९८ टक्के भरला. तलाव भरल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ समाधानी होते.
3 / 8
चाटगाव,दिंद्रुड, संगमसह पाच ते सहा गावच्या शिवारात शेती व पिण्यासाठी पाणी या तलावातून वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होते.
4 / 8
तलावातील संपादित क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पीक लागवड केलेली आहे. ही पिके पाण्याखाली जात असल्याने तलावाचा सांडवा फोडण्यात आला असावा अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
5 / 8
सांडव्याची चिरेबंदी भिंत एक फूट उंच तर जवळपास चार फूट रुंद फोडण्यात आली आहे. भविष्यात जोरदार पाऊस झाल्या तर पाण्याचा दाब वाढून भिंतीला मोठे भगदाड पडू शकते.
6 / 8
तसेच तलावातील पाणी वाहून जात तलावाखालील चाटगाव, संगमसह अनेक गावांना आणि तलाव परिसरातील शेतींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
7 / 8
दरम्यान, पाटबंधारे विभागाशी याबाबत संपर्क केला असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
8 / 8
चाटगाव, दिंद्रुड व संगम ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पहा व्हिडिओ - https://fb.watch/7hXOXJKrMZ/
टॅग्स :BeedबीडWaterपाणीDamधरणFarmerशेतकरी