शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० वर्षांनी अद्भूत योग: यंदा गणेश चतुर्थीला शुभ संयोग; ५ राशींवर बाप्पाची कृपा, अपार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 3:50 PM

1 / 9
Ganesh Chaturthi 2024: चातुर्मासातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे. यानंतर गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.
2 / 9
यंदाची गणेश चतुर्थी खूप खास मानली जात आहे. या दिवशी विशेष अद्भूत शुभ योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. काही मान्यतांनुसार, १०० वर्षांनी दुर्मिळ दुर्लभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्मयोग आणि इंद्र योग जुळून येत आहे. तसेच स्वाती आणि चित्रा नक्षत्राचा शुभ संयोगही आहे.
3 / 9
गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रम्ह योगासारखे शुभ योग बनत आहेत. तसेच अनेकार्थाने हा दिवस अतिशय पुण्यफलदायी मानला गेला आहे. या शुभ योगांचा काही राशींना सर्वोत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ: चांगल्या बातम्या मिळू शकतील. गणपतीच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवन सुधारू शकेल. कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील. ध्येय साध्य करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. बौद्धिक क्षमताही वाढेल. धन-संपत्तीत चांगली वाढ होईल.
5 / 9
कर्क: हा काळ फार उत्साहवर्धक असणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामकाज सुरळीत सुरु राहील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकेल. काम खूप चांगले होईल. आगामी काळ सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकेल.
6 / 9
कन्या: ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील. जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडू शकेल. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवू शकता. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहू शकतील. चांगली प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.
7 / 9
तूळ: गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नवीन लोक भेटतील, जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला जीवनात बदल घडवून आणेल.
8 / 9
वृश्चिक: समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून उत्तम यश मिळवू शकता. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा काळ असेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४