शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 7:35 AM

1 / 9
१९ तारखेला रक्षाबंधन आहे. संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जातो. ही श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या रक्षाबंधनाला दोन उत्तम राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
2 / 9
आताच्या घडीला सिंह राशीत सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह विराजमान आहेत. बुध वक्री आहे. काही दिवसांनी बुध वक्री चलनाने कर्क राशीत प्रवेश करेल. तर शुक्र पुढील राशीत गोचर करेल. तत्पूर्वी रक्षाबंधनाला या तीन ग्रहांचे दोन राजयोग जुळून आले आहेत. हे राजयोग अतिशय शुभ मानले गेले आहेत.
3 / 9
बुधादित्य आणि शुक्रादित्य असे ते राजयोग असून, सूर्य, बुध आणि शुक्राच्या युतीने सिंह राशीत त्रिग्रही योगही जुळून आला आहे. कोणत्या राशींना आगामी काळात फायदा, नफा, सकारात्मकता प्राप्त होऊ शकते, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष: मुलांच्या बाजूने येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळवून चांगला आर्थिक नफा मिळवू शकता.
5 / 9
वृषभ: भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. ध्येयाकडे लक्ष असेल. नोकरीत अनेक फायद्यांसह चांगली प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना मोठी डील किंवा ऑर्डर मिळू शकते. फायदा होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. भावंडांसोबत वेळ चांगला जाईल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे.
6 / 9
मिथुन: परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. इच्छित ठिकाणी बदली किंवा बढती होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतील. योजनेत किंवा व्यवसायात मागील गुंतवणूक नफा मिळवून देण्याची शक्यता आहे.
7 / 9
सिंह: यश मिळेल तसेच आर्थिक लाभ होऊ शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाचे कौतुक होऊ शकेल. प्रगतीसोबत काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. परदेशातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने आर्थिक लाभ होईल.
8 / 9
कुंभ: कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळू शकेल. जीवनात प्रगती आणि चांगल्या संधी मिळतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटल्याने भविष्यात मोठा फायदा होईल. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. परीक्षा स्पर्धांची तयारी करत आहेत त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.
9 / 9
मीन: अनेक संधी मिळू शकतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते. परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचा विचार करत होते, त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रिय जोडीदारासोबत अनेक आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मास