शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ ला भाजपवर शनीची कृपा होणार? लोकसभेत पुन्हा बाजी मारणार की ममता दीदींची वाणी खरी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 7:39 AM

1 / 15
आताच्या घडीला राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ओढ लागलेली असली, तरी देशपातळीवर हळूहळू सर्वच राजकीय पक्षांकडून सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, चाचपणी सुरू करण्यात आली आहे. (lok sabha election 2024)
2 / 15
सन २०१४ पासून भाजप केंद्रात सत्तेत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी स २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तशीच कमाल दाखवू शकणार का, याकडे आता अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असणार आहे. सर्व विरोधी पक्षांची एक अजोड मोट बांधण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
3 / 15
यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यापासून ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापर्यंत अनेकविध प्रादेशिक, राष्ट्रीय विरोधक एकत्र येऊन भाजप आणि मोदींविरोधात मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.
4 / 15
आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास देशाचा मूड काय असेल, याचेही सर्व्हे येऊ लागले आहेत. यातच आता ममता बॅनर्जी या भाजप आणि मोदींचा विजयी रथ रोखू शकणार की, सन २०१९ पेक्षा अधिक मोठा विजय भाजप साजरा करणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
5 / 15
देशातील आताच्या राजकीय परिस्थितीत सन २०२४ च्या निवडणुकीत विरोधक भाजपसमोर आव्हान उभे करू शकतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण येत्या दोन वर्षांत ग्रहमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळणार असून, त्याचा परिणाम सत्ताधारी आणि विरोधकांवर दिसून येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
6 / 15
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून, स्वतंत्र भारताच्या वृषभ राशीच्या कुंडलीत, तृतीय भावात बसलेल्या चंद्राच्या महादशामध्ये, पाचव्या स्थानाचा स्वामी बुधाची अंतर्दशा सुरू आहे आणि नवव्या स्थानी शनीच्या भ्रमणात, देशातील धर्म आणि सामाजिक प्रश्नांच्या राजकारणात शनी राज्य करत आहे, जो सत्ताधाऱ्यांना लाभदायक ठरताना दिसत आहे.
7 / 15
परंतु पुढील वर्षी १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणारा शनी स्वतंत्र भारताच्या कुंडलीतील कर्क राशीच्या चंद्रातून आठव्या स्थानातून जाऊन भारतीय राजकारणाची परिस्थिती बदलू शकतो. मेदिनी ज्योतिषानुसार, चंद्र देशातील लोकांच्या मनःस्थितीचा किंवा सार्वजनिक भावनांचा प्रतिनिधी मानला जातो. जेव्हा शनी एखाद्या राष्ट्राच्या स्थित चंद्रापासून चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या भावात प्रवेश करतो, तेव्हा लोकांच्या चिंतेचे प्रश्न आणि भावना बदलू लागतात.
8 / 15
भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीत झाली. भाजपच्या कुंडलीनुसार, मिथुन राशीचा उदय होत आहे. गेल्या ८ वर्षात केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या कुंडलीत एप्रिल २०१८ पासून सहाव्या घरात बसलेल्या चंद्राची स्थिती कमकुवत असून त्यात पक्षाने मोठे यश संपादन केले आहे. मात्र, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि मनोहर पर्रीकर अशा दिग्गज नेत्यांच्या अकाली निधनामुळे न भरून येणारी हानी सहन करावी लागली आहे.
9 / 15
भाजपच्या कुंडलीत द्वितीय घराचा स्वामी चंद्र असल्याने धन आणि प्रतिशोधाचे फळ देत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जुलै २०२२ पासून भाजपच्या कुंडलीत शनीची अंतर्दशा सुरू आहे, ती फेब्रुवारी २०१४ पर्यंत राहील.
10 / 15
भाजपच्या कुंडलीत ८व्या आणि ९व्या घराचा स्वामी शनी, राहू, गुरू आणि मंगळ यांच्या संयोगाने आपला शत्रू सूर्य, सिंह राशीत प्रतिगामी स्थितीत बसला आहे, ज्यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांसोबत अचानक काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळत असल्याचे म्हटले जात आहे.
11 / 15
यासोबतच भाजपच्या वृश्चिक राशीतून चंद्र राशीतून शनीचे चतुर्थ भावात होणारे संक्रमण पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देईल, पण यश सोपे जाणार नसेल.
12 / 15
कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या मोठ्या राज्यांमधील सन २०२३ च्या विधानसभा निवडणुका भारताचे राजकीय परिदृश्य बदलण्याची शक्यता आ
13 / 15
ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, सन २०२४ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. विरोधी पक्ष २०२४ पर्यंत भाजपचा विजय रथ रोखण्याच्या स्थितीत असतील का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
14 / 15
सन २०२३ पर्यं होणाऱ्या देशातील विधानसभांच्या निवडणुकांनंतर सन २०२४ ची लोकसभा निवडणूक खूपच रंजक असेल, भाजप नक्कीच ममता बॅनर्जींच्या भाकिताचा विचार करेल. त्यामुळे निवडणुकीचा निकाल खूपच रोमांचक असणार आहे, असे म्हटले जात आहे.
15 / 15
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, भविष्यात नेमके काय घडणार, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा