शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ योगांचा संयोग: ५ राशींना मंगलमय, लक्ष्मी देवीची कृपा; कामे होतील, पैसे मिळतील, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 7:07 AM

1 / 9
जानेवारी महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला असून, या कालावधीतही ग्रहांचे अद्भूत योग जुळून येत आहेत. चंद्र बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत असून, मंगळ आणि चंद्र यांचा समसप्तम योग जुळून येत आहे. यामुळे लक्ष्मी योग तयार होत आहे. याशिवाय ऐंद्र योग, रवि योग आणि आर्द्रा नक्षत्राचा योग जुळून येत आहे.
2 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, हे योग शुभ मानले गेले असून, काही राशीच्या व्यक्तींना याचा उत्तम लाभ मिळू शकतो. तसेच काही ज्योतिषीय उपाय सांगितले गेले आहेत, ज्यामुळे कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती मजबूत होऊन प्रतिकूल प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
3 / 9
या योगांच्या संयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीसह शिक्षण, नोकरी, करिअर यांमध्ये प्रगतीच्या शुभ संधी प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. तसेच लक्ष्मी देवीसह हनुमान आणि गणपती बाप्पाची कृपा राहू शकेल. सुख-समृद्धी येऊ शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. कामात येणारे अडथळे हनुमंतांच्या कृपेने दूर होतील. वाणीमुळे इतरांवर प्रभाव पडू शकेल. नवीन भाषा आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने अपूर्ण सरकारी कामे नजीकच्या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत परस्पर प्रेम राहील. शक्य असल्यास हनुमंतांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. ११ वेळा प्रदक्षिणा घाला. हनुमान चालीसा पठण किंवा श्रवण करा आणि हनुमान मंत्रांचा जप करावा.
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी शुभ आणि फलदायी असणार आहे. आत्मविश्वास वाढेल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकाल. नोकरदारांना अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांती मिळेल. करिअरमध्ये समाधानाची भावना राहील. व्यावसायात चांगल्या नफ्याची अपेक्षा करू शकता. शक्य असल्यास हनुमान चालिसा पठण किंवा श्रवण करावी. हनुमंतांना श्रीफल अर्पण करावे.
6 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काळ फायदेशीर ठरू शकेल. पैसे मिळण्याची विशेष शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून आवश्यक सहकार्य मिळेल. मानसिक शांतता लाभू शकेल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. मंगळाच्या कृपेने धैर्य वाढेल. कामाचा उत्साह कायम राहील. घरगुती वातावरणात सुख-शांती अनुभवास येईल. नोकरदारांना सहकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. शक्य असेल तर हनुमानजींना लाल फुले अर्पण करा.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना कालावधी अनुकूल ठरू शकेल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकाल. नियोजनपूर्वक काम केल्याने अडथळे दूर होतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळत राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. मुलांकडून मानसन्मान मिळाल्याने मनाला आराम मिळेल. शक्य असेल तर हनुमंतांची पूजा, नामस्मरण करावे.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना काळ अनुकूल राहू शकेल. हनुमंतांच्या कृपेने सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल. मानसिक शांतता अनुभवाल. अनुकूल नशिबामुळे करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. व्यवसायात फायदा होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराची योजना आखू शकाल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जात असेल तर यश मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकते. मित्र आणि जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. शक्य असल्यास मंगळवारचे विशेष व्रत करावे. २१ दिवस हनुमान मंदिरात बजरंग बाणाचे पठण करावे.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य