गजकेसरी योगासह ४ राजयोग: ५ राशींवर लक्ष्मीची अपार कृपा, गुंतवणुकीतून नफा, नवीन नोकरीची ऑफर! By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 7:07 AM
1 / 10 सन २०२४ नववर्षाची सुरुवात होताच अनेकविध योग जुळून येत आहेत. गुरु मेष राशीत, बुध वृश्चिक राशीत मार्गी झाले आहेत. तसेच राहु-केतु आणि सूर्य-शनी या ग्रहांनी नक्षत्र गोचर केले आहे. आगामी काही दिवसांत आणखी काही अद्भूत योग जुळून येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 2 / 10 शुक्रवारी विविध विशेष योग जुळून येत आहेत. याचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहेत. मार्गशीर्ष कृष्ण नवमी तिथी असून, गजकेसरी योग, सुकर्मा योग, धृतिमान योग, लक्ष्मी नारायण योग यांसह चित्रा नक्षत्राचा शुभ योग जुळून येत आहे. 3 / 10 शुक्रवार या दिवसावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो, असे सांगितले जाते. आताच्या घडीला शुक्र वृश्चिक राशीत आहे. याच राशीत बुध मार्गी झाल्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण नामक शुभ योग जुळून येत आहे. तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी विशेष मानला जातो. 4 / 10 शुक्रवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केल्यास त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात. लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख-समृद्धी, वैभव, धन-धान्य प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. ५ राशीच्या लोकांना करिअर, बिझनेस, नोकरी या क्षेत्रात उत्तम लाभ, यश-प्रगतीच्या संधी प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. त्या ५ भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घेऊया... 5 / 10 मिथुन राशीच्या व्यक्तींना सुकर्मा योगाचा शुभ-लाभ मिळू शकेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची, भाग्याची उत्तम साथ मिळू शकेल. करिअरमध्ये प्रगतीचा वेग वाढू शकेल. गुंतवणूक केली असेल तर, चांगला परतावा मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक समस्यातून दिलासादायक मार्ग दिसू शकेल. करिअरमध्ये प्रगतीची चांगली शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. शक्य असेल तर लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी नारायण स्तोत्राचे मनोभावे पठण किंवा श्रवण करावे. 6 / 10 कन्या राशीच्या व्यक्तींना धृतिमान योग लाभदायक ठरू शकेल. नशिबाची साथ मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आदर वाढेल. नोकरीच्या शोधात असाल किंवा दुसरी नोकरी करू इच्छित असाल तर देवी लक्ष्मीच्या कृपेने उत्तम संधी, ऑफर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकेल. व्यापारी वर्गाला लाभ होतील. प्रगती आणि यश मिळेल. मन प्रसन्न राहील. भावंडांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. घरातील कामात मदत होईल. जोडीदारासोबत बोलल्याने समस्या कमी होऊ शकतील. शक्य असल्यास लक्ष्मी कवच स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. 7 / 10 वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गजकेसरी योगाचा लाभ मिळू शकेल. ज्या योजना चालू होत्या, त्या आता देवी लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होऊ लागतील. सन्मानात चांगली वाढ होईल. वडिलांसोबत संबंध चांगले राहतील. व्यवसायात सल्ला फायदेशीर ठरेल. जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल. जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत, त्यांना नशिबाची साथ मिळेल. यश मिळू शकेल. व्यवसायातील वरिष्ठ सदस्य किंवा अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने चांगला फायदा होईल. शक्य असेल तर लक्ष्मी देवीची उपासना, नामस्मरण करावे. 8 / 10 मकर राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग अद्भूत ठरू शकतो. परदेश दौऱ्यावर जाण्याबाबत काही संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातही अधिक रस असेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने असे काही काम हातून घडू शकेल, ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होईल. अडकलेले पैसे किंवा येणी मिळू शकतील. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. शक्य असेल तर लक्ष्मी चालीसाचे पठण किंवा श्रवण करावे. 9 / 10 मीन राशीच्या व्यक्तींना चित्रा नक्षत्राचा लाभ मिळू शकेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने नवीन आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याच्या संधी मिळत राहतील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी होतील. शत्रू प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतील पण ते पूर्णपणे अयशस्वी ठरतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने अडकलेला पैसा मिळू शकेल. क्षमता वाढेल. बुद्धिमत्ता विकसित होईल. नवीन कल्पना सुचू शकतील. भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. शक्य असल्यास लक्ष्मी देवीचे पूजन करावे. श्रीसुक्ताचे पठण किंवा श्रवण करावे. लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. 10 / 10 - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा