शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shani Vakri 2023: ४ महिने शनी वक्री: ५ राशींना लाभ, यश-प्रगतीची संधी; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, शनी शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 3:06 PM

1 / 9
नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीदेव आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. सन २०२५ पर्यंत शनी याच राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. मात्र, काही दिवसांनी शनी वक्री होणार असून, सुमारे ४ महिने शनी वक्री अवस्थेत असणार आहे. (shani vakri in kumbh rashi 2023)
2 / 9
शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे आताच्या घडीला मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तर कुंभ राशीचा साडेसातीचा मधला किंवा दुसरा टप्पा सुरू आहे. याशिवाय मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपेल, असे सांगितले जात आहे. (saturn retrograde in aquarius 2023)
3 / 9
कुंभ राशीत विराजमान असलेला शनी १७ जून रोजी याच राशीत वक्री होणार आहे. तर ४ नोव्हेंबर रोजी शनी याच राशीत पुन्हा मार्गी होणार आहे. शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. शनी मंदगतीचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश असल्याने जसे तुम्ही कर्म कराल, तसा तो न्याय करतो, असे म्हटले जाते.
4 / 9
शनीचे वक्री होणे काही राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ-फलदायी मानले जात आहे. करिअर, नोकरी, व्यवसाय, बिझनेस, कार्यक्षेत्र, पैसा यांमध्ये शनीची कृपा झाल्यास जातकाची चांगली भरभराट करू शकतो, असे सांगितले जाते. शनी वक्री होण्याचा कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल, कोणत्या राशींना फायदा होऊ शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री होणे लाभदायक ठरू शकते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी वक्री अवस्थेत आहे, त्या लोकांना शनीचे हे संक्रमण भाग्यकारक ठरू शकेल. कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु मेहनतीचे भरपूर फळ मिळू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. जे लोक कौटुंबिक काम आणि व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. शुभ कार्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. अनेक बिघडलेले संबंध सुधारू शकतील.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री होणे लाभकारक ठरू शकेल. एखादे काम अनेक दिवसांपासून काही कारणाने अडकले असेल तर ते या काळात पूर्ण होऊ शकेल. वेगाने प्रगती होऊ शकेल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतील. आर्थिक लाभाची शक्यता अधिक असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या काळात चांगले निकाल मिळू शकतील.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री होणे अनुकूल ठरू शकेल. अचानक धनलाभ देऊ शकेल. विविध प्रकारचे लाभ मिळू शकतील. अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. मेहनतीचे चांगले फळ मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळू शकतील.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा वक्री होणे अच्छे दिन आणणारे ठरू शकेल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. मालमत्ता विकण्याचा विचार करत असाल तर हा कालावधी चांगला ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतील. घरातील वातावरण चांगले राहू शकेल. मन प्रसन्न होऊ शकेल.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शनीचे वक्री होणे यशकारक ठरू शकेल. कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा कालावधी विशेष फलदायी ठरू शकतो. व्यवसायात वाढ दिसून येऊ शकते. या काळात प्रगती करण्यात यश मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य