शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ ग्रहांचे गोचराने ३ राजयोग: १० राशींना शुभ काळ, अडकलेला पैसा मिळेल; नोकरीत बढती, यश-प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 1:44 PM

1 / 13
डिसेंबर महिना सुरू झाला आहे. शुक्र ग्रह मकर राशीत विराजमान झाला आहे. याच महिन्याच्या अखेरीस शुक्र पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे शुक्र आणि शनीचा युती योग जुळून येऊ शकेल.
2 / 13
तसेच शुक्र आणि मंगळ यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. याशिवाय गुरू आणि शुक्र यांचा नवपंचम योग जुळून येत आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ धनु संक्रांती म्हणून ओळखला जात आहे.
3 / 13
सूर्याच्या धनु राशीतील गोचराला खरमास असेही म्हटले जाते. एकूणच ग्रहांच्या गोचराचा आणि राजयोगांचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, वरदान काळ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 13
मेष: करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांकडूनही मदत मिळेल, त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असाल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही नफा मिळू शकेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.
5 / 13
वृषभ: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. यासोबतच नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. यातूनच आनंददायी घटना घडू शकतात. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावे लागू शकतील. नफ्यासोबत यशही मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र, अनावश्यक खर्च टाळावा.
6 / 13
मिथुन: काही चांगली बातमी मिळू शकते. करिअरच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. काही तणाव असू शकतो, परंतु हळूहळू परिस्थिती सुधारेल. कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. धीर धरा, यश मिळू शकेल. नोकरीत बढती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.
7 / 13
कर्क: गुरु-शुक्राची विशेष कृपा लाभू शकेल. यश मिळू शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात भरीव यशासोबतच आर्थिक लाभही मिळू शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. यासोबतच हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
8 / 13
सिंह: शुभ आणि सौभाग्याचा काळ राहू शकेल. केलेल्या कष्टाचे आणि प्रयत्नांचे शुभ परिणाम मिळतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पदे किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. मान-सन्मान वाढेल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. कामाचा अतिरिक्त दबाव राहील. प्रिय जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहू शकतील. आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकेल.
9 / 13
कन्या: करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. लव्ह लाइफमध्ये गोडवा राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी चांगली बातमी येऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. अध्यात्माकडे कल असेल.
10 / 13
तूळ: नोकरी आणि करिअरमध्ये बदल होऊ शकतात. एखाद्या खास मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरदार महिलांसाठी हा काळ चांगला राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. पती-पत्नीमध्ये चांगला समन्वय राहू शकेल.
11 / 13
वृश्चिक: भाग्याची साथ लाभेल. ज्या संधी खूप दिवसांपासून शोधत होत्या त्या मिळू शकतात. कुटुंबाकडून, विशेषतः वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरदारांना बढती किंवा बदली मिळू शकते. लव्ह लाइफ चांगली राहू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
12 / 13
धनु: लाभ मिळू शकतो. भाग्याची साथ लाभू शकते. कामाच्या ठिकाणी पद मिळेल किंवा मोठी डील मिळू शकते. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतील. व्यवसायात वाढ होऊ शकेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
13 / 13
मीन: इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळू शकेल. भागीदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या भागीदारांशी चांगले संबंध राखण्यात यश मिळेल. व्यवसायात योजना यशस्वी होतील. आयुष्यात एकटेपणा कमी होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी खास प्रवेश करेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक