शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ ग्रहांचे राशीपरिवर्तन ५ राशींना लाभच लाभ; गुंतवणुकीतून नफा, फेब्रुवारी ठरेल फायद्याचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 9:53 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी महिना अतिशय विशेष ठरला. त्याचप्रमाणे आता फेब्रुवारी महिनाही महत्त्वाचा ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४ ग्रह आपली रास बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सर्व १२ राशींसह देश-दुनियेवर प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.
2 / 9
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह ७ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत सूर्य विराजमान असल्याने बुधादित्य योग जुळून येईल. यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ तारखेला बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील सूर्य आणि शनी युतीने त्रिग्रही योग जुळून येईल.
3 / 9
१३ फेब्रुवारीला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. यानंतर, १८ फेब्रुवारीला नेपच्यून मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे नेपच्यून शुक्र आणि गुरुचा विशेष योग जुळून येऊ शकेल.
4 / 9
ग्रहांच्या या राशीबदलामुळे फेब्रुवारी महिना रोमँटिक आणि अनेक राशींसाठी लाभदायक असेल. बुध, सूर्य, शुक्र आणि नेपच्यून ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींसाठी ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकही चांगला नफा मिळू शकेल. पालकांच्या मदतीने तुमची बरीच सरकारी कामे पूर्ण होऊ शकतील. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भौतिक सुखसोयी वाढतील. मात्र, आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन आनंददायी ठरू शकेल. वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराची साथ मिळेल. सामाजिक सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अद्भुत ठरेल. मेहनतीचे फळ मिळेल. अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन फायदेशीर ठरू शकेल. रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. भावंडांसोबत तुमचे नाते घट्ट होईल. त्यांचा पाठिंबाही मिळेल. बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतील. प्रिय व्यक्तीच्या मदतीने अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गासाठी फायदेशीर काळ ठरू शकेल.
8 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन चांगले ठरू शकेल. लाभाच्या अनेक संधी मिळतील. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नाते मजबूत होईल. समाजात कामाचे कौतुक होईल आणि सन्मानही वाढेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. पैसा मिळेल. परदेशात जाण्याची इच्छा आहे, त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकेल.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन लाभदायक ठरू शकेल. आहे. ग्रहांचा शुभ प्रभाव जीवनात सकारात्मकता आणेल. अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होईल. सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. उत्साह वाढेल. निर्णय क्षमतेचाही पूर्ण फायदा होईल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमविण्याच्या संधी मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य