शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एप्रिलमध्ये ४ ग्रहांचे गोचर: ६ राशींना उत्तम काळ, भाग्याची साथ; धनलाभाचे योग, फायदाच फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 7:07 AM

1 / 11
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. तसेच सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह कधी वक्री चलनाने गोचर करत नाहीत. तर राहु आणि केतु कधी मार्गी होत नाहीत. अन्य ग्रह खगोलीय भ्रमणानुसार, वक्री, मार्गी होत असतात. काही दिवसांत एप्रिल महिना सुरू होणार आहे.
2 / 11
एप्रिल महिना धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला गेला आहे. मराठी नववर्ष सुरू होणार आहे. श्रीराम नवमी आहे. राम नवरात्र आहे. यासह अनेक शुभ फलदायी व्रते, सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ४ ग्रहांचे गोचर एप्रिल महिन्यात होणार आहे.
3 / 11
एप्रिल महिन्यात होणाऱ्या ४ ग्रहांच्या गोचरामुळे काही उत्तम योगही जुळून येणार आहेत. याचा सकारात्मक लाभ ६ राशींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. एप्रिल महिन्यात बुधाचे गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. कारण याच महिन्यात बुध वक्री, अस्तंगत आणि वक्री चलनाने राशीपरिवर्तन करणार आहे. बुधासह या महिन्यात सूर्य, शुक्र आणि मंगळ राशीपरिवर्तन करणार आहे.
4 / 11
०२ एप्रिल २०२४ रोजी बुध मेष राशीत वक्री होत आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीकारक मानला जातो. बुधच्या वक्री चलनाने काही राशींना लाभ होऊ शकतो, तर काही राशींना संमिश्र काळ ठरू शकतो. मेष, वृषभ, सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
5 / 11
०४ एप्रिल २०२४ रोजी वक्री झालेला बुध ग्रह मेष राशीत अस्तंगत होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाच्या या स्थितीला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होणे, असे म्हटले जाते. बुध अस्तंगत स्थितीचा काही राशींवर अनुकूल किंवा प्रतिकूल प्रभाव पडणार आहे.
6 / 11
०९ एप्रिल २०२४ रोजी अस्तंगत असलेला बुध वक्री चलनाने मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर १० मे २०२४ रोजी पर्यंत बुध मीन राशीत असेल. त्यानंतर तो मेष राशीत मार्गी चलनाने प्रवेश करेल. बुध मीन राशीत असताना काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकेल.
7 / 11
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १३ एप्रिल २०२४ रोजी मेष राशीत प्रवेश करेल. सूर्य ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्यानंतर मेष संक्रांती सुरू होईल. मेष राशीत गुरु विराजमान आहे. त्यामुळे सुमारे १२ वर्षांनी सूर्य-गुरूचा युती योग जुळून येऊ शकेल. अशा स्थितीत मेष आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतील.
8 / 11
२३ एप्रिल २०२४ रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशाने बुध आणि राहुसोबत युती होईल. काही राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे काही राशीच्या लोकांनी सावधगिरीने पुढे जावे लागेल.
9 / 11
२५ एप्रिल २०२४ रोजी शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. १९ मेपर्यंत शुक्र या राशीत राहील. नंतर स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र मेष राशीत आल्याने या राशीत गुरू-शुक्र संयोग तयार होईल. अशा परिस्थितीत मेष, वृषभ आणि सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.
10 / 11
या ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे मेष, वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना सर्वाधिक लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना खूप शुभ आणि भाग्यशाली ठरू शकतो. एप्रिल महिना नोकरदारांना आर्थिक लाभ देऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य