शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२७ फेब्रुवारीला ४ ग्रहांचे ४ राजयोग; ‘या’ ४ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; बक्कळ कमाईची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:11 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील काही ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करीत असतात. ग्रहांच्या या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग, राजयोग तयार होत असतात. या योगांचा प्रभाव सर्व राशींसह देश-दुनियेवर पडत असतो, असे सांगितले जाते. काही राशींना हा काळ चांगला ठरतो, तर काही राशींना संमिश्र ठरतो.
2 / 9
२७ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला कुंभ राशीत सूर्य आणि शनी हे दोन महत्त्वाचे ग्रह विराजमान आहे. बुधाच्या कुंभ प्रवेशानंतर ४ मोठे राजयोग तयार होत आहेत.
3 / 9
बुध ग्रह कुंभ राशीत विराजमान झाल्यानंतर सूर्य आणि बुधाच्या युतीचा बुधादित्य राजयोग जुळून येईल. याशिवाय नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेल्या शनीचा शश नामक राजयोग जुळून येत आहे. सूर्य आणि शनी शत्रू ग्रह मानले गेले आहेत. असे असले तरी शनी सध्या अस्तंगत असल्यामुळे शनीचा अधिक प्रभाव दिसून येणार नाही, असे सांगितले जात आहे.
4 / 9
याशिवाय शुक्राने आपल्या उच्च राशी असलेल्या मीन राशीत प्रवेश केला आहे. मीन राशीत आधीपासूनच गुरु ग्रह विराजमान आहे. शुक्राचा मालव्य राजयोग जुळून येत आहे. तसेच गुरुच्या प्रभावामुळे हंस नामक राजयोग जुळून येत आहे. काही मान्यतांनुसार, गुरु आणि शुक्र शत्रू ग्रह मानले गेले आहे. त्यामुळे कुंभ आणि मीन या दोन्ही राशींमध्ये शत्रू ग्रहांची युती झाल्याचे सांगितले जात आहे.
5 / 9
बुधाच्या कुंभ प्रवेशाने ४ राजयोग सक्रिय होणे हे वृषभ राशीसह चार राशींसाठी अतिशय शुभ आणि फलदायी मानले जात आहे. वृषभ राशीसह कोणत्या राशींना ४ ग्रहांच्या ४ राजयोगाचा लाभ मिळू शकेल, तुमची रास कोणती? जाणून घ्या...
6 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांच्या ४ राजयोगाचा काळ शुभ फलदायी ठरू शकेल. शुक्राच्या मालव्य राजयोगामुळे कला आणि सर्जनशीलता वाढू शकेल. कलाविश्वाशी निगडीत असलेल्यांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीतही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सौहार्द राहील. छंद आणि मनोरंजनाची साधने मिळू शकतील. भाऊ आणि काका यांच्याकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय राहील, प्रगतीची संधी मिळू शकेल.
7 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांच्या ४ राजयोगाचा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकेल. बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमतेचा पुरेपूर लाभ मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचाफायदा होऊ शकतो. आर्थिक आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतील. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य आणि लाभ मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढू शकेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रयत्न अधिक तीव्र करावे.
8 / 9
कुंभ राशीत बुध प्रवेश करत आहे. या राशीत दुहेरी राजयोग तयार होत आहे. शनी आणि सूर्य-बुधांचा राजयोगाचा काळ या राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला ठरू शकेल. रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. भविष्यातील योजनेवर काम करू शकता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात तुमचा सन्मान वाढेल आणि वैवाहिक जीवनातही तुमचा समन्वय चांगला राहील.
9 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांच्या ४ राजयोगाचा काळ शुभ ठरू शकेल. कुटुंबातील आनंद द्विगुणित होऊ शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकतील. आर्थिक बाबतीत प्रगती कराल. आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांना या राजयोगांच्या प्रभावाने चांगली कमाई होईल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. वागण्यात आणि बोलण्यात आत्मविश्वास दिसून येईल. भविष्यासाठी कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता, जो फायदेशीर असेल. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊन त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील आवड वाढेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य