शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५० वर्षांनी महाष्टमीला ४ राजयोग: ७ राशींना वरदान काळ, धनलक्ष्मीची अपार कृपा; भरभराटीसह लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:52 PM

1 / 10
नवरात्रोत्सव सुरू आहे. सरस्वती आवाहन, पूजन, महालक्ष्मी पूजन केले जाणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. तत्पूर्वी महाष्टमी आणि महानवमी या दोन तिथी मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणार आहेत. नवरात्रोत्सवात शुभ लाभदायक असे सर्वोत्तम योग जुळून येत आहेत. काही योग ५० वर्षांनी जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 10
नवरात्री काळात बुध आणि शुक्र गोचर करणार आहेत. तूळ राशीत या दोघांचा युती योग जुळून येणार आहे. तसेच लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. नवरात्रात महाष्टमी तिथीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण आहे.
3 / 10
शारदीय नवरात्रोत्सवात ११ ऑक्टोबर रोजी महाष्टमी आहे. या दिवशी महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदाची महाष्टमी खूप खास मानली जाते. या दिवशी महानवमी सुरू होत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि बुधादित्य राजयोग जुळून येणार आहेत. कोणत्या राशींसाठी महाष्टमी शुभ ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 10
मेष: महाष्टमी फायदेशीर ठरू शकते. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक असाल तर चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी प्रयत्नांवर समाधानी राहू शकतील. नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. या काळात नियोजित योजना यशस्वी होतील. व्यक्तिमत्व सुधारेल.
5 / 10
कर्क: महाष्टमी शुभ ठरू शकते. या काळात बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती होईल. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकेल. अनेक अपूर्ण प्रकल्प सुरू होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. त्याचबरोबर परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. या काळात मनोकामना पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
6 / 10
सिंह: आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नशीब पूर्ण साथ देईल. प्रगतीत जे अडथळे येत होते ते आता दूर होतील. विरोधक त्रास देऊ शकणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कोणतेही काम करताना घाई होणार नाही याची विशेष काळजी घ्या.
7 / 10
कन्या: महाष्टमी अनुकूल ठरू शकते. देश-विदेशात सहलीला जाऊ शकता. नोकरदारांना लाभाची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. लोकांच्या करिअरसाठी वेळ खूप अनुकूल आहे. या काळात सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच गुंतवणुकीचा फायदा होईल. व्यापारात एखादा मोठा व्यवहार होऊ शकतो. या काळात मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
8 / 10
तूळ: नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे सुख मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून काळ चांगला असणार आहे. एकामागून एक उत्तम लाभाच्या संधी मिळतील. राजकारणाशी निगडित लोकांसाठी काळ शुभ राहील. काही मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकते. काही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतील. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. मुलांशी संबंधित कामगिरी समाजात विशेष सन्मान मिळवून देणार आहे.
9 / 10
वृश्चिक: करिअरशी संबंधित यश मिळू शकते. नोकरदार महिलांची प्रगती होऊ शकते. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणारे विद्यार्थी आणि परदेशात आपले करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. प्रेम जीवनात बरेच सकारात्मक बदल दिसतील. विवाहित लोकांसाठीही काळ चांगला जाणार आहे. जोडीदारासोबत संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील.
10 / 10
मीन: शुभ आणि मनोकामना पूर्तीचा काळ ठरू शकतो. मेहनतीचे फळ मिळेल. आनंददायी काही बातम्या मिळू शकतील. कुटुंबाबद्दल असलेल्या सर्व चिंता संपतील. जमीन-मालमत्ता संबंधित एखादा वाद मिटू शकतो. यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Navratriनवरात्रीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य