शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ राजयोगांचा महासंयोग: ७ राशींना शुभ काळ; उधारीचे पैसे येतील, बँक बॅलन्स वाढेल; पद-यश लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:07 AM

1 / 10
ज्योतिषशास्त्रानुसार आगामी काही दिवस ४ राजयोगांचे असणार आहेत. सिंह राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. तीन ग्रहांच्या संयोगाने तसेच शनी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे हे शुभ योग जुळून येत आहेत. हे शुभ योग राजयोगाप्रमाणे फले देऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
2 / 10
सिंह राशीत सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. तर सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य योग, सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योग तसेच बुध आणि शुक्र यांचा लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. तसेच शनी मूल त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे शश नामक योग जुळून येत आहेत. हे चारही योग राजयोग मानले गेले आहेत.
3 / 10
या राजयोगांचा लाभ काही राशींना होऊ शकतो, असे सांगितले गेले आहे. काही दिवसांसाठी हे राजयोग जुळून येणार असून, बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या गोचरानंतर यातील तीन राजयोगांची सांगता होईल. तोपर्यंत हे योग काही राशींना आर्थिक आघाडी, नोकरी, व्यवसाय, करिअर अशा अन्यविध क्षेत्रात सकारात्मक अनुकूलता देऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
4 / 10
मेष: उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल. नशिबाची साथ लाभू शकेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. करिअरमध्ये चांगला लाभ मिळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. व्यवसायात नफा कमवण्याची संधी मिळू शकते.
5 / 10
मिथुन: नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. लोकप्रिय व्हाल. मान-सन्मान मिळेल. अनावश्यक खर्चात घट होऊ शकेल. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. देश-विदेशातही प्रवास करू शकता. जोडीदार आणि कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील.
6 / 10
सिंह: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात मोठे काम होऊ शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तणाव दूर करेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता.
7 / 10
कन्या: पैशाची बचत करण्यात यश मिळेल. राजकारणात सक्रिय असलेल्यांना काही पद मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना यावेळी नवीन, उत्कृष्ट संधी मिळू शकते. उधारीचे पैसे मिळतील. मन प्रसन्न राहू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल.
8 / 10
वृश्चिक: उत्तम यश मिळेल. बेरोजगारांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांचे निकाल अनुकूल असतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उधारीचे पैसे परत मिळू शकतात. लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा खूप चांगली होऊ शकेल. मुलांकडून आनंद मिळेल.
9 / 10
कुंभ: लोकप्रिय व्हाल. सन्मान, प्रतिष्ठा मिळेल. विविध क्षेत्रात यश मिळवाल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल. बरेच दिवस रखडलेले काम आता पूर्ण होऊ शकते. भागीदारीच्या कामात लाभ होऊ शकतो.
10 / 10
मीन: आनंदी वातावरण असेल. नोकरी-व्यवसायात लाभ होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मास