शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:16 PM

1 / 13
Ashwin Sankashti Chaturthi October 2024: अश्विन महिन्यात कोजागरी नवान्न पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थी असणार आहे. याच दिवशी उत्तर भारतात करवा चौथचे व्रत साजरे केले जाणार आहेत. तसेच या दिवशी दाशरथी चतुर्थी, करक चतुर्थी आहे. तसेच काही मान्यतांनुसार, या दिवशी ५ राजयोग जुळून येणार आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
2 / 13
गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात.
3 / 13
संकष्ट चतुर्थीला शश राजयोग, गजकेसरी योग, महालक्ष्मी राजयोग, बुधादित्य राजयोग आणि गुरु-शुक्र ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहेत. अशा प्रकारचा योग ८० वर्षांनी जुळून येत असल्याची मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. या राजयोगांचा १० राशींना अपार लाभ, फायदा, यश-प्रगती, धनलक्ष्मी देवीची कृपा लाभू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 13
वृषभ: पाच राजयोग फायदेशीर ठरू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ त्या दृष्टीनेही अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. गुंतवणूक करून व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. भविष्यात फायदा होईल. मनोकामना पूर्ण होतील.
5 / 13
मिथुन: यशासोबतच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडे अधिक कल असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. काम पाहून वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ तसेच सहकारी प्रशंसा करतील. काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून नफा कमवू शकता. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत सापडू शकतात.
6 / 13
कर्क: बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. भौतिक सुख मिळू शकते. पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी प्रयत्नांवर समाधानी राहतील. नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध सौद्यांमधून प्रचंड नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
7 / 13
सिंह: परदेशातून भरपूर लाभ मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती या काळात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. जीवनात अनेक प्रकारे आनंददायी घटना घडू शकतात. अडकलेला किंवा उधारी दिलेला पैसा परत येऊ शकतो. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. व्यवसायातही भरपूर नफा कमावण्याची संधी मिळू शकते.
8 / 13
कन्या: पाच राजयोग शुभ ठरू शकतात. वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात भरपूर कमाई करण्याची संधी मिळेल. धैर्य आणि शौर्य वाढेल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असू शकेल. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल.
9 / 13
तूळ: पंचराजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात. काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. एखादी लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळू शकेल. चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होईल. सरकारचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. नियोजित योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच लोकांशी नवीन संबंध निर्माण होऊ शकतील.
10 / 13
वृश्चिक: मित्र आणि हितचिंतकांच्या सहकार्याने सर्व कामे सहज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधीनस्थांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ अधिकारी कामाचे पूर्ण कौतुक करतील. कुटुंबासोबत किंवा मनोरंजनासाठी कुठेतरी जाण्याची संधी मिळेल. कमी अंतराचा सुखद प्रवास संभवतो. अचानक एखादी प्रिय व्यक्ती भेटू शकते. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल.
11 / 13
धनु: नशिबाची पूर्ण साथ लाभू शकेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळाली तर ती स्वीकारण्यास अजिबात संकोच करू नका. एखाद्याशी संबंध बिघडले असतील तर मध्यस्थांच्या मदतीने पूर्ववत करू शकाल. प्रेम जीवनातील गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायातही चांगली प्रगती होईल.
12 / 13
मकर: गजकेसरी योग खूप फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिका-यांचे सहकार्य मिळू शकते. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ती फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजार आणि लॉटरीत चांगले पैसे कमवू शकता. आर्थिक स्थिती मजबूत होऊन बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.
13 / 13
कुंभ: शश राजयोग चांगला ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. पदोन्नतीसह वेतनवाढ मिळण्याच्या अनेक शक्यता आहेत. शेअर बाजारातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. मेहनतीचे फळ मिळू शकेल. देवी लक्ष्मीची अपार कृपा राहू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीchaturmasचातुर्मासAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य