शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७०० वर्षांनी ५ राजयोगांचा महासंयोग: ४ राशींना कमाईचे अपार योग, धनवृद्धीचा लाभ; शानदार काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 1:24 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग जुळून येत असतात. फेब्रुवारीप्रमाणे मार्च महिन्यातील ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे अद्भूत पण दुर्मिळ शुभ योग जुळून आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात ६१७ वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला होता. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
मार्च महिन्यातील ग्रहांच्या शुभ योगांमुळे आता ७०० वर्षांनंतर ५ अद्भूत राजयोग जुळून येत आहेत. यातील पहिला राजयोग केदार नामक राजयोग असून, नवग्रहांपैकी ७ ग्रह ४ राशींमध्ये विराजमान असतील, तेव्हा केदार राजयोग जुळून येतो. आताच्या घडीला कुंभ, मीन, मेष आणि वृषभ या ४ राशींमध्ये सूर्य, बुध, शनी, गुरु, शुक्र, राहु आणि मंगळ हे सात ग्रह विराजमान आहेत.
3 / 9
यानंतर मीन राशीत विराजमान असलेल्या गुरुच्या प्रभावामुळे हंस नामक राजयोग जुळून आलेला आहे. तर शुक्रही गुरुसोबत मीन राशीत विराजमान आहे. मीन ही शुक्राची उच्च रास मानली गेली आहे. मीन राशीतील शुक्राचा मालव्य राजयोग जुळून येत आहे. याशिवाय चतुष्चक्र राजयोग जुळून येत आहे.
4 / 9
याशिवाय सूर्य आणि चंद्राचा महाभाग्य राजयोग जुळून येत आहे. या ५ अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष मानल्या गेलेल्या राजयोगांचा चार राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या...
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना ५ राजयोगांचा महासंयोग अतिशय शुभ ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. गुरु आणि शुक्राशी संबंधित राजयोगांमुळे नोकरदार वर्गाला चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायिकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक गणित सुधारल्याने घरातील वातावरणही आनंदी राहू शकेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना ५ राजयोगांचा महासंयोग भाग्यकारक ठरू शकेल. हंस आणि मालव्य योगांमुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. भौतिक सुखांचा आनंद उपभोगता येईल. कामानिमित्त परदेश दौऱ्याची संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल ठरू शकेल.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना ५ राजयोगांचा महासंयोग अच्छे दिनाचा ठरू शकेल. सप्तम भावात मालव्य राजयोग जुळून आला आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असू शकेल. भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला उत्तम फायदा मिळू शकेल. अविवाहित लोकांचे लग्न जमू शकते. आर्थिक गणित अधिक सक्षम होऊ शकेल.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना ५ राजयोगांचा महासंयोग अनुकूल ठरू शकेल. मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. हंस आणि मालव्य राजयोग फलदायी ठरेल. या योगामुळे आत्मविश्वास दुपटीने वाढलेला पाहायला मिळू शकेल. साहस आणि पराक्रमात बदल दिसून येईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून कौतुकाची थाप मिळू शकेल.
9 / 9
मार्च महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ हे चार ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याशिवाय धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्याही मार्च महिना महत्त्वाचा मानला जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य