शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हनुमंताचे ५ सोपे मंत्र, शिकवतील भक्ती, युक्ती, शक्तीचे तंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:34 AM

1 / 5
शरीराबरोबर मनाचेही स्वास्थ्य गरजेचे आहे. यासाठी शक्तीच्या उपासकांनी रोज सकाळी व्यायामाला सुरुवात करताना ५ मिनिटे ध्यानधारणा करून 'ॐ अं अंगारकाय नमः' हा जप १०८ वेळा करावा. नंतर नित्य व्यायामाला सुरुवात करावी.
2 / 5
रामरक्षा आणि मारुती स्तोत्रात या श्लोकाचा उल्लेख आलेला आहे. एरव्हीसुद्धा मारुतीची स्तुती करताना आपण हा श्लोक म्हणतो. वाऱ्यापेक्षा वेगवान असलेल्या मनावर ज्याने विजय मिळवला आहे आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो अशा पवनपुत्र रामदूता तुला आमचा नमस्कार असो.
3 / 5
जप, स्तोत्र, मंत्रांमध्ये उच्चाराला महत्त्व आहे. मंत्र किती वेळा म्हटला हे महत्त्वाचे नसून तो कसा म्हटला यावर त्याचा प्रभाव ठरतो. मंत्रांमधले इकार, उकार, हुंकार विशिष्ट हेतूने दिलेले असतात, ते जसे च्या तसे म्हणणेच अभिप्रेत असते. त्यानुसार वरील मंत्र नीट उच्चारासह १०८ वेळा म्हणावा.
4 / 5
ही देखील मारुती रायाची केलेली स्तुती आहे. स्तुती, कवन हे देवाचे गोडवे गाण्यासाठी नसून देवाच्या कीर्तीची ओळख आपल्याला पटावी म्हणून केलेली असते. त्यानुसार वरील श्लोकात म्हटले आहे, की जो अतुलनीय शक्तीचे धाम आहे, कणखर देहाचा, ज्ञानी, विद्वान, सर्वगुणसंपन्न, वानरांचा प्रमुख, तरी रामाचा सेवक म्हणवून घेणारा असा हनुमंत तुला आमचा नमस्कार!
5 / 5
हनुमंत हा रुद्रावतार मानला जातो. शिव शंकराच्या देहाचा दाह राम नामाने शांत झाला तेव्हापासून ते कायमस्वरूपी रामभक्त झाले आणि त्यांनी राम युगात हनुमंत बनून रामरायाची सेवा पत्करली. अशा रुद्राचे आणि हनुमंताचे स्मरण करण्यासाठी वरील मंत्र १०८ वेळा भक्तिभावाने म्हणावा.