शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ राशींना जूनची सुरुवात सुखद! रोमांस वाढेल, प्रेम बहरेल; आनंदाची बातमी मिळेल, अनुकूल काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:13 PM

1 / 15
जून महिन्याची सुरुवात होत आहे. जून महिन्यात तीन महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. तर एक ग्रह स्वराशीत वक्री होत आहे. जून महिन्याची सुरुवात अनेकार्थाने विशेष ठरणारी असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 15
मे महिन्याच्या अखेरीस शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, यांचा कारक मानला जातो. शुक्राचे राशीपरिवर्तन प्रेमात असलेल्या लोकांसाठी महत्त्वाचे मानले गेले आहे. याशिवाय जून महिन्यात सूर्य, बुध, मंगळ आणि शनी स्थानबदल करणार आहेत.
3 / 15
शुक्राचे राशीपरिवर्तन आणि जून महिन्याच्या सुरुवातीची ग्रहस्थिती पाहता प्रेमात असलेल्या व्यक्तींना कशी जाईल? एकमेकांतील संबंध, प्रेमभाव, जिव्हाळा, रोमांस कसा असेल? शुक्राचा प्रभाव कसा पडू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात प्रेमसंबंधांमध्ये काहीशी चिंतित ठरू शकेल. एकमेकांशी बोलणे बंद होऊ शकते. मात्र, संवादातूनच प्रश्न, गैरसमज सोडवता येऊ शकतात. त्यामुळे संवाद सुरू करण्यावर भर देणे हिताचे ठरू शकेल. कालांतराने प्रेम जीवनात रोमँटिक क्षण अनुभवता येऊ शकतील. नवीन टप्प्याकडे जाऊ शकाल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात संमिश्र ठरू शकेल. प्रेमसंबंध सुदृढ करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतील. त्यानंतरच सुखद अनुभव घेऊ शकाल. एखाद्या महिलेमुळे तणाव येऊ सकतो. परिस्थिती तुमच्या बाजूने असेलच असे नाही. मात्र, सारासार विचाराने कृती केल्यास प्रेमानुभव वाढू शकेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात अनुकूल ठरू शकेल. लव्ह लाइफसंदर्भात चांगली बातमी प्राप्त होऊ शकेल. रोमांस वाढू शकेल. सारासार विचाराची कृती जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद वाढवणारी ठरू शकेल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात संमिश्र ठरू शकेल. लव्ह लाइफमध्ये तणाव येऊ शकतो. तणावामुळे निद्रानाशाचा त्रास संभवू शकतो. मात्र, कालांतराने यात फरक पडू शकेल. सकारात्मकता येऊ शकेल. लव्ह लाइफमध्ये सुख, सौहार्द वृद्धी होऊ शकेल. रोमँटिक क्षण अनुभवाल. वैवाहिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात लव्ह लाइफमध्ये काहीशी कष्टकारक होऊ शकते. बेचैनी वाढू शकेल. तुम्हाला अपेक्षित बदल प्राप्त होण्यासाठी संयम ठेवावा लागेल. मात्र, कालांतराने सुख, समृद्धीचा अनुभव घेऊ शकाल. एखाद्या व्यक्तीची मदत होऊ शकेल. लव लाइफ सुखकर होऊ शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात प्रेम जीवनासाठी उत्तम ठरू शकेल. मन प्रसन्न राहू शकेल. प्रेमसंबंध सुदृढ होऊ शकतील. रिलेशनमध्ये नवीन टप्प्याला सुरुवात होऊ शकेल. रोमँटिक क्षणांचा अनुभव घेऊ शकाल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात काहीशी संमिश्र ठरू शकेल. लव्ह लाइफबद्दल थोडे गोंधळलेले राहू शकाल. आपापसात अहंकाराचा संघर्षही वाढू शकतो. ही परिस्थिती तात्पुरती असेल. कालांतराने वेळ अनुकूल होईल. परस्पर प्रेम दृढ होईल. जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊ शकता. दोघांमध्ये चांगला समन्वय असेल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात काहीशी कठीण असू शकेल. परिस्थिती तुमच्या विरुद्ध जात आहे असे वाटेल, परंतु धीर धरा कारण जीवनातील कठीण टप्प्यानंतर वेळ अनुकूल होईल. कालांतराने चांगली बातमी मिळेल. परस्पर प्रेम दृढ होईल. प्रेमाच्या बाबतीत हुशारीने काम करा.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात काहीशी संमिश्र ठरू शकेल. लव्ह लाइफमध्ये चिंता वाटू शकेल. तणाव वाटू शकेल. अधिक विचाराचा परिणाम झोपेवर होऊ शकेल. मात्र, कालांतराने वेळ अनुकूल असेल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने परस्पर प्रेम दृढ होईल. प्रेम जीवन रोमँटिक होईल. संयमाने काम करा आणि प्रत्येक प्रश्न संवादातून सोडण्यावर भर द्यावा.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात रोमँटिक राहील. परस्पर प्रेम दृढ होईल. प्रेम जीवनासाठी शुभ काळ आहे. प्रेम जीवनात सुखद क्षण अनुभवता येऊ शकतील. एखादी अपेक्षा पूर्ण होईलच असे नाही. योग्य वेळ येण्याची वाट पाहावी.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात अनुकूल होऊ शकेल. हळूहळू सुसंगतता येऊ शकेल. प्रेमाच्या नात्यात रोमान्सचा अनुभव घेऊ शकाल. काही प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. नशिबाची साथ लाभू शकेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना जूनची सुरुवात अनुकूल ठरू शकेल. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी चांगला काळ आहे. प्रेम जीवनात बदल दिसू शकतील. परस्पर प्रेम वाढू शकेल. समजूतदारपणा वाढू शकेल. एखाद्या स्त्रीच्या मदतीने प्रेम जीवन उज्ज्वल होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य