शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daridra Yog 2023: ५२ दिवस दरिद्र योग: ८ राशींना ताप, संमिश्र काळ; ५ राशी मालमाल, यश-प्रगतीसह धनलाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 2:44 PM

1 / 15
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत विराजमान झालेला आहे. ग्रहांच्या गोचरामुळे राशींवर, देश-दुनियेवर प्रभाव पडत असतो, असे सांगितले जाते. तसेच ग्रहांच्या गोचरामुळे अनेकविध प्रकारचे योग, राजयोग, शुभ योग, प्रतिकूल योग जुळून येत असतात. नियमित काळात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात.
2 / 15
कर्क राशीत मंगळ विराजमान होताच प्रतिकूल मानला गेलेला दरिद्र योग जुळून आला आहे. या योगात अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अडचणीत भर पडू शकते, असे सांगितले जाते. मंगळ कर्क राशीत विराजमान आहे, तोपर्यंत हा योग कायम असेल, असे म्हटले जात आहे. मिथुनसह अन्य राशींवर या योगाचा प्रतिकूल प्रभाव पडू असेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
दरिद्र योग प्रतिकूल मानला गेला असला तरी ५ अशा राशी आहेत, ज्या राशींना या योगाचा फायदा मिळू शकतो. नोकरी, व्यापार आर्थिक आघाडीवर यश-प्रगती प्राप्त केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना योग लाभदायक ठरणार आणि कोणत्या राशींना तापकारक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. मोठा निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्यावा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. चिंतन करावे. वादाचे प्रसंग टाळणे हिताचे ठरू शकेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग दिलासादायक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी ज्यांचा त्रास होत होता, त्यापासून दिलासा मिळू शकेल. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वांत कठीण परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असाल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढू शकेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी किंवा नागरिकत्वासाठी व्हिसा इत्यादीसाठी अर्ज करणे यशस्वी होऊ शकेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही परिस्थितीत बोलण्यापूर्वी विचार करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. खर्चात वाढ होऊ शकते. सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे. नोकरदारांना अचानक काही बदलांना सामोरे जावे लागू शकेल. हितशत्रूंवर बारीक लक्ष ठेवणे हिताचे ठरू शकेल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वादविवादापासून दूर राहावे लागेल. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकेल. नवीन करारावर स्वाक्षरी करताना दोनदा विचार करावा. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. सावधपणे प्रवास करा. कालांतराने फायदा होऊ शकेल.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. मोठे व्यवहार करणे लांबणीवर टाकणे हिताचे ठरू शकेल. कुणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा उधारी परत मिळताना समस्या येऊ शकतात. कोणत्याही कामात घाई करणे टाळा. आर्थिक स्थिती सुधारू शकते. गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. वादविवादांपासून दूर राहावे.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग चांगला ठरू शकेल. गोड बातमी मिळू शकते. भावंडांशी संबंध बिघडू शकतात. उत्पन्न वाढू शकते. नोकरीत खूप फायदा होऊ शकतो. तंत्रज्ञानाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात केलेली गुंतवणूक चांगली ठरू शकेल. मात्र, त्यापूर्वी योग्य सल्ला घ्यावा.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग लाभदायक सिद्ध होऊ शकेल. व्यवसायात यश मिळू शकेल. कार्यक्षेत्रात विस्तार होऊ शकेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात. शुभ लाभ मिळू शकतील. शासनाचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळू शकेल. कामाची रूपरेषा तयार करून पुढे जावे.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग लाभदायक ठरू शकेल. विविध प्रकारचे फायदे मिळू शकतील. समाजात सन्मान वाढू शकेल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यातही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. साहस, धैर्य आणि शौर्याच्या जोरावर कठीण प्रसंगांवर मात करू शकाल. मुलाची जबाबदारी पार पडेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतात.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक बाबतीत अत्यंत सावध व सतर्क राहून काम करावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणालाही उधार पैसे देऊ नका. अनपेक्षित चढ-उतार असूनही आर्थिक बाजू मजबूत राहू शकेल. धातूशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला जातो.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही तणाव जाणवू शकतो. बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे राहील.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना दरिद्र योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकेल. कामात, व्यवसायात प्रगती होऊ शकेल. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत बेफिकीर न राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थी परदेशात शिक्षणसाठी व्हिस अर्ज करू पाहत आहेत, तर ही वेळ काळ अनुकूल ठरू शकेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना दरिद्र योगात उत्पन्नाचे साधन वाढू शकेल. अभ्यासातील अनास्थेमुळे समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते, काळजी घ्यावी. मुलांशी संबंधित चिंता त्रासदायक ठरू शकतात. कौटुंबिक ज्येष्ठ सदस्य आणि मोठे भाऊ यांचे सहकार्य मिळेल. रणनीती गोपनीय ठेवून काम केल्यास अधिक यश मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य