शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 9:07 AM

1 / 9
दिवाळी अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे. दीपोत्सवाची धूम संपूर्ण देशभरात पाहायला मिळते. दिवाळीत अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळी साजरी करण्याला एक मोठी परंपरा आहे. दीपोत्सव हा मराठी वर्षातील एक महत्त्वाचा सण-उत्सव आहे. देशभरात विविध ठिकाणी वैविध्यपूर्ण दिवाळी साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला ५९ वर्षांनंतर दुर्मिळ पण शुभ योग जुळून आला आहे.
2 / 9
दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे महत्त्वाचे सण मानले जातात. ५९ वर्षांनंतर धनत्रयोदशीला ग्रहांचा दुर्मिळ संयोग होत आहे. धनत्रयोदशीला शनी ३० वर्षांनी कुंभ राशीत असेल. शुक्र कन्या राशीत, गुरू मेष राशीत आणि सूर्य तूळ राशीत असेल.
3 / 9
मेष राशीतील गुरुची सूर्याकडे सातवी दृष्टी आहे. सूर्य आणि गुरुचा समसप्तक योग जुळून आला आहे. शनीचा मूळ त्रिकोणात शश राजयोग जुळून येत आहे. शुक्र अनुकूल कन्या राशीत आहे. ग्रहांच्या शुभ योगांमुळे ५ राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशी शुभ फलदायी ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अशा काही संधी मिळणार आहेत ज्या खूप फलदायी ठरतील. जी काही गुंतवणूक कराल, त्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. शक्य असेल तर यथाशक्ती ॐ घृणि: सूर्याय नम:, ॐ अं अंगारकाय नम: या मंत्रांचा जप करावा.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशी लाभदायक ठरू शकेल. सरकारी काम असेल तर पूर्ण होऊ शकते. या काळात अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाबाबत नवीन योजनाही बनवू शकता. ॐ शं शनैश्चराय नम:, या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.
6 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशी अनुकूल ठरू शकेल. एक वेगळाच उत्साह दिसेल. विवाहयोग्य तरुण-तरुणींना नवीन चांगली स्थळे येऊ शकतील. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीनेही ग्रहांचा संयोग खूप शुभ सिद्ध होईल. आर्थिक दृष्टीकोनातून खूप अनुकूल असणार आहे. मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. ॐ रां रहवे नम: या मंत्राचा दररोज किमान २१ किंवा १०८ वेळा जप करा.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशी अनुकूल ठरू शकेल. समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काम वेळेवर पूर्ण होईल. मानसिक स्थितीही चांगली राहील. नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप काही साध्य करेल. ॐ बृहस्पतये नम: या मंत्राचा बुधवारी १०८ वेळा जप करावा.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशी अनुकूल ठरू शकेल. एखादे काम अडले असेल तर ते पूर्ण होईल. कौटुंबिक जीवन खूप शांत असेल. व्यावसायिकांना खूप चांगली डील मिळू शकते. मोठा आर्थिक लाभ मिळेल. उत्पन्न खूप जास्त असेल. संपत्ती वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ॐ घृणि: सूर्याय नमः या मंत्राचा दररोज १०८ वेळा जप करावा.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी