शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गजकेसरीसह ६ राजयोग: ११ राशींना अपार लाभ, भरघोस भरभराट; पद-पैसा वाढ, नववर्षाची सुरुवात दमदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 10:09 IST

1 / 15
३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा आहे. या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. यंदा विश्वावसू नामक संवत्सर आहे. चैत्र नवरात्र, श्रीराम नवरात्र सुरू होणार आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या ज्योतिषीय घटना घडणार असून, याचा प्रचंड मोठा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतो.
2 / 15
२९ मार्च २०२५ रोजी फाल्गुन शनि अमावास्या आहे. याच दिवशी शनि स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी मानले जाते. तसेच या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे. विद्यामान घडीला मीन राशीत सूर्य, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह आहेत. या सर्वांशी शनिचा युती योग जुळून येणार आहे. कन्या राशीत असलेल्या केतुशी समसप्तक योग जुळून येणार आहे.
3 / 15
शनिचा मीन राशीत प्रवेश होताच मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. तसेच गुरु आणि चंद्र ग्रह यांच्या केंद्र योगाने गजकेसरी योग जुळून येणार आहे. याशिवाय, बुधादित्य, शुक्रादित्य, मालव्य, लक्ष्मी नारायण योग असे अनेक राजयोग जुळून येत आहे. मार्च महिन्याची सांगता आणि हिंदू नववर्षाची होणारी सुरुवात अनेकांना मालामाल करणारी, दमदार आणि वरदान काळाप्रमाणे फळ देणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 15
मेष: अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न कराल, त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. एका विद्वान व्यक्तीची भेट होईल जी कारकिर्दीत काहीतरी मोठे करण्यासाठी प्रेरित करेल. धार्मिक कार्यात अधिक रस असेल. मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्येवर उपाय मिळेल. जोडीदारासोबतच्या नात्याबद्दल सर्व गैरसमज दूर होतील.
5 / 15
वृषभ: एकंदरीत ग्रहस्थिती पाहता हिंदू नववर्षारंभ अनुकूल ठरू शकेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात अनेक पट नफा मिळू शकेल. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतील. योजना यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमधूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर, मान-सन्मान वाढेल. नवीन मित्र बनतील. अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल.
6 / 15
मिथुन: हिंदू नववर्ष सकारात्मक ठरू शकते. जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आता यश मिळू शकते. नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकता. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन व्यवसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल. तसेच या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमधील तणाव संपेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येऊन तरुणांना जीवनात उच्च स्थान मिळेल.
7 / 15
कर्क: हिंदू नववर्ष अनुकूल ठरू शकते. शनिचे मीन राशीत गोचर होताच दिलासा मिळू शकेल. रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण होईल. नशिबाची साथ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता नांदू शकेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढेल. कोणत्याही गुंतवणूकीचा किंवा व्यवसाय योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम वेळ आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने मोठा नफा मिळू शकतो. इच्छा पूर्ण होतील.
8 / 15
सिंह: नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरेल. पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळतील. अनेक वरिष्ठांशी संपर्क सौहार्दपूर्ण असतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असणार आहेत. आर्थिक लाभ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते.
9 / 15
तूळ: आनंद, सुख आणि समृद्धी प्राप्त होण्याची प्रबळ शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही मोठ्या चांगल्या बातम्या मिळतील. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. चैनीच्या गोष्टींवर पैसे खर्च कराल. असे केल्याने मन खूप आनंदी होईल. शुभचिंतकांच्या मदतीने काही मोठे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराची कोणतीही मोठी कामगिरी कुटुंबात आनंद आणू शकते.
10 / 15
वृश्चिक: धनलाभ होण्याची शक्यता आहे. शहाणपणाने खर्च करा. करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाकडूनही समर्थन मिळू शकेल. कामात पूर्ण पाठिंबा देईल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी प्रवासाची शक्यता आहे. हे प्रवास खूप शुभ ठरतील. नवीन मित्राच्या मदतीने नवीन कामाची योजना कराल. त्यांच्या मदतीने काही नवीन काम सुरू करू शकता.
11 / 15
धनु: हिंदू नववर्षाचा आरंभ उत्तम ठरू शकेल. सुखसोयी आणि सुविधा वाढतील. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन व्यवसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. शनिच्या मीन राशीतील गोचराने धैर्य आणि शौर्य वाढेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.
12 / 15
मकर: हिंदू नववर्ष सकारात्मक ठरू शकते. प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळवण्याच्या संधी मिळतील. नवीन प्रकल्पांवर काम केल्याने यश मिळेल. गुंतवणूक आणि बचतीसाठी हा काळ योग्य आहे. शनि ग्रहाचे मीन राशीत गोचर होताच साडेसातीपासून मुक्तता मिळणार आहे. आदर आणि सन्मान वाढेल.
13 / 15
कुंभ: बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. समस्या संपतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. शनि मीन राशीत प्रवेश करताच साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. जीवनाची गाडी पुन्हा काहीशी रुळावर येताना दिसेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यासोबतच बचत करण्यातही यशस्वी व्हाल. परदेशी कंपन्यांकडून खूप फायदे मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळवू शकता. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवू शकाल.
14 / 15
मीन: २९ मार्च २०२५ रोजी शनि या राशीत प्रवेश करणार आहे. पुढील सुमारे अडीच वर्ष शनि या राशीत असेल. शनिचा प्रवेश होताच मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. याने आत्मविश्वास वाढेल. समाजात आदर वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक शांतता लाभू शकेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल.
15 / 15
फाल्गुन शनि अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे म्हटले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकgudhi padwaगुढीपाडवा