शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 7:00 AM

1 / 12
आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल-व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे ‘धनत्रयोदशी’ म्हटले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश ‘धनतेरस’ असा आहे. या दिवशी धनाची पूजा करण्याचा पूर्वापार परिपाठ आहे. धनत्रयोदशी हीच धन्वंतरी जयंतीही आहे. धन्वंतरी म्हणजे समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यापैकी एक प्रमुख रत्न. धर्म आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी धनत्रयोदशीच्या निमित्ताने अशा एकत्र आल्या आहेत, असे सांगितले जाते.
2 / 12
यंदा मंगळवार, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी सुमारे ९ राजयोग जुळून येत आहेत. मंगळ आणि राहु यांचा नवमपंचम योग, राहु आणि शनी यांचा परिवर्तन राजयोग, शुक्र आणि बुध यांचा लक्ष्मी नारायण योग, मंगळाचा नीचभंग राजयोग, तसेच त्रिग्रही योग, त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृती योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा शुभ संयोग, असे अनेक अद्भूत, दुर्मिळ योग जुळून येत आहेत.
3 / 12
धनत्रयोदशीला जुळून येत असलेले शुभ योग, राजयोग, दुर्मिळ योग ९ राशींसाठी भाग्यकारक, दिवाळीला भरभराट, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढवणारे, जीवनात सकारात्मक अनुकूलता आणणारे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: अधिकाधिक पैसा मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात. गुंतवणुकीचे बरेच फायदे मिळणार आहेत. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात केलेल्या कामात यश मिळवू शकाल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. फायदा आणि प्रगती होऊ शकेल. आयात-निर्यात व्यवसायात नफा मिळू शकेल. मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात. नशिबाची पूर्ण साथ लाभू शकेल. परदेशात राहणारे लोक भरपूर पैसे कमवू शकतात.
5 / 12
वृषभ: राहु आणि शनी यांच्या परिवर्तन राजयोगाचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. कामात भरपूर यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ चांगला जाईल. करिअरच्या क्षेत्रात बरेच बदल पाहायला मिळतील. पदोन्नती, बोनस आणि वेतनवाढ यांसारखे फायदे मिळू शकतात. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो.
6 / 12
मिथुन: करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. नोकरीत मोठे बदल होऊ शकतात. अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. मेहनतीचे फळ नक्कीच मिळू शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. एखाद्याला दिलेले उसने पैसे परत मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाशी संबंधित लांब प्रवास करावा लागू शकतो. यातून चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीत जीवनात अनेक प्रकारचे सुख येऊ शकेल.
7 / 12
कर्क: पाच दुर्मिळ योग फायदेशीर ठरू शकतात. या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ, अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहमान अनुकूल ठरू शकेल. या काळात काही लक्झरी वस्तूंची खरेदी करण्यावर भर राहू शकेल.
8 / 12
कन्या: नवपंचम योग प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकेल. कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. काही समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळू शकते. स्वतःमध्ये बदल करू शकाल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. व्यवसाय, नोकरीत पद, पैसा, प्रतिष्ठा वाढू शकते. व्यावसायिक भागीदारासोबत सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. दिवाळीनिमित्त नफा कमवू शकता.
9 / 12
तूळ: पंच राजयोग अनुकूल ठरू शकतो. व्यावसायिकांना अपेक्षित नफा होऊ शकतो. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो. भविष्यात फायदा होऊ शकतो. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. जमीन, मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी काही पुरस्कार किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.
10 / 12
वृश्चिक: धनलक्ष्मी राजयोगाचा विशेष लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. अनेक प्रकारच्या आनंददायी घटना घडू शकतात. व्यक्तिमत्व सुधारण्याची संधी मिळू शकते. करिअर आणि बिझनेसच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमवू शकता. मुलांकडूनही काही शुभवार्ता मिळू शकतात. करिअरमध्ये स्थान आणि प्रतिष्ठा मिळू शकते.
11 / 12
धनु: अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या आता संपुष्टात येऊ शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळू शकते. भौतिक सुखात वाढ होऊ शकेल. घर, वाहन, मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. सुख-सुविधा वाढू शकतील. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. देश-विदेशात फिरू शकता. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते.
12 / 12
मीन: लक्ष्मी नारायण योग चांगला राहू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. फायदा होऊ शकेल. जी काही कामे प्रलंबित होती ती पूर्ण होतील. वाहन सुख मिळेल. आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. कामामुळे आदर आणि सन्मान वाढेल. आनंद वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटू शकतील. वडिलोपार्जित संपत्तीचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक