A celebration of consciousness… Know the days and timings of Diwali 2024
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:04 PM1 / 8दीपावली हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. दीपोत्सव सोमवार २८ ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या दिवशी सुरू होऊन रविवार ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज सणाने समाप्त होतो. दीपावलीचा सण साजरा करताना पर्यावरणाचे भान आपण ठेवूया. दीपावली सणामधील प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त आपण जाणून घेऊया, खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्याकडून...2 / 8प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने या दिवशी गोवत्स द्वादशी, वसुबारस साजरी करावयाची आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर गाय आणि वासरू यांची पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य खायला द्यायचा आहे. भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती असल्याने आपण दीपावलीचा आनंदोत्सव साजरा करण्याअगोदर गाय- वासराची पूजा करून त्यांच्याविषयी आदर प्रकट करावयाचा आहे.3 / 8या दिवशी धनत्रयोदशी आहे. याच दिवशी धन्वंतरी पूजन करावयाचे आहे. या दिवशी गरिबांना दीपदान, वस्त्रदान आणि अन्नदान करावयाचे आहे. गरिबांना दीपावलीचा सण आनंदाने साजरा करता यावा हा यामागचा उद्देश आहे. या दिवशी सकाळी ९.३१ ते १०.५७ चल, सकाळी १०.५८ ते १२.२३ लाभ, १२.२४ ते १.४९ अमृत किंवा ३.१५ ते सायं. ४.४१ शुभ चौघडीमध्ये व्यापारी हिशोबाच्या वह्या आणाव्यात. 4 / 8दीपावलीचा कोणताही सण नाही.5 / 8चंद्रोदयाच्यावेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशीचा सण साजरा करावयाचा आहे. या दिवशी चंद्रोदय पहाटे ५.२८ वाजता आहे, सूर्योदय सकाळी ६.४० वाजता आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. सुगंधी तेलाने, उटणे लावून मसाज करावा. नंतर उष्णोदक पाण्याने स्नान करावे. याला अभ्यंगस्नान म्हणतात. अभ्यंगस्नान केल्याने स्नायू बळकट होतात. त्वचा कांतिमान होते.6 / 8प्रदोषकाली आश्विन अमावास्या असल्याने या दिवशी सायं. ६.०४ ते रात्री ८.३५ या काळात लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. या दिवशी अभ्यंगस्नान आणि अलक्ष्मी निस्सारण करायचे आहे. झाडूची पूजाही करावयाची आहे. याच दिवशी श्री महावीर निर्वाण दिवस आहे.7 / 8कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा सण आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करतात. तसेच शुभ कार्याचा प्रारंभ करतात. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. या दिवशी विक्रम संवत् २०८१ अनलनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याच दिवशी महावीर जैन संवत् २५५१ चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजा करावयाची आहे. या दिवशी सकाळी ८.०६ ते ९.३१ शुभ, दुपारी १२.३१ ते दुपारी १.४६ चल, दुपारी १.४७ ते ३.११ लाभ किंवा दुपारी ३.१२ ते ४.३६ अमृत चौघडीमध्ये वही पूजन आणि वही लेखन करावयास उत्तम मुहूर्त आहे.8 / 8या दिवशी भाऊबीज सण आहे. बंधू- भगिनीचे प्रेम जिव्हाळा वृद्धिंगत करणारा हा सण असतो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण त्याला ओवाळते, भाऊ तिला भेटवस्तू देतो. आणखी वाचा Subscribe to Notifications