शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समुद्रज्योतीषशास्त्रानुसार गालावर, हातावर आणि कपाळावर तीळ असणे ठरते लाभदायी, तसेच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 4:53 PM

1 / 9
समुद्रज्योतिषशास्त्र सांगते, की आपल्या शरीरावरील खुणा आपला स्वभाव आणि भाग्याच्या निर्देशक असतात. तीळ हा त्यातला महत्त्वाचा घटक मानला जातो. जसे की गालावर असलेला आकर्षक व्यक्तिमत्त्वात भर घालतो आणि धनवान बनवतो.
2 / 9
नाकावर तीळ असणाऱ्या लोकांचे आयुष्य अतिशय खडतर असते. तसेच त्यांना लोकांमध्ये मिसळणे फारच कमी आवडते. त्यांच्या संपर्कात मोजके लोक असतात पण त्यांच्याशी यांचं जुळेलच याची शाश्वती नाही.
3 / 9
नाकाच्या खाली किंवा ओठाच्या वर असलेला तीळ सौंदर्याचे प्रतीक मानला जातो. अनेक नट्या, अभिनेत्री तसा तीळ गोंदवून सुद्धा घेतात. परंतु ज्यांना अशा तिळाची नैसर्गिक देणगी असते, अशा व्यक्ती अतिशय रसिक, भावनिक आणि संवेदनशील असतात.
4 / 9
कपाळावर तीळ असणारे लोक भाग्य घेऊन जन्माला येतात. सुरुवातीला कष्ट करावे लागले तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत ते श्रीमंती पुरेपूर उपभोगतात. काही जणांना कपाळाच्या मध्यभागी अर्थात गंध स्थानी तीळ असतो, असे लोक कलाप्रांतात खूप नाव कमावतात.
5 / 9
तळहातावर असलेला तीळ लाभदायक असतो, परंतु तोच तीळ तळहाताच्या उंचवट्यावर किंवा बोटांवर असेल तर ते दुर्भाग्याचे कारण ठरते. ज्या बोटावर तीळ असतो, त्या स्थितीचा ग्रह कमकुवत होतो आणि मनुष्य अपयशी ठरतो. पालथ्या हातावर तीळ असेल तर मनुष्य आळशी होतो.
6 / 9
पायावर तीळ असेल तर ती व्यक्ती आपल्या कुटुंबापासून कायम दूर राहते. याउलट पायाच्या तळव्यावर असलेला तीळ भाग्योदयाच्या दिशेने नेणारा ठरतो.
7 / 9
पोटावर तीळ असणाऱ्यांना कायम आरोग्याच्या तक्रारी असतात. काळ्या तिळाप्रमाणे लाल तीळ सुद्धा असतो. परंतु काही जणांच्या बाबतीत तो लाभदायक तर काही जणांच्या बाबतीत तो दुर्भाग्याचे लक्षण ठरतो.
8 / 9
हात किंवा दंडावर तीळ असेल तर ते आर्थिक सुबत्तेचे लक्षण असते. त्यातही तो लाल तीळ असेल तर परदेशात जाऊन धनप्राप्तीची संधी अधिक असते. मात्र असा तीळ चेहऱ्यावर असणाऱ्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागते.
9 / 9
पाठीवर लाल तीळ असेल तर हे शौर्याचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्ती साहसी असतात. सेनेत किंवा सुरक्षा विभागात सामील होतात. त्यांच्या साहसाचे सगळ्यांकडून कौतुक होते.