शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adhik Maas 2023: केवळ अधिक मासात देवघरात लावतात तांब्याचा दिवा; वाचा देवपूजेतील दिव्यांसंबंधीचे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 3:25 PM

1 / 6
देवपूजा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणं, वस्तू वा साधने तुटकी फुटकी, खराब, चिरा पडलेली नसावीत.तसेच ती शक्यतो आहेत तीच वर्षानुवर्षे वापरावीत.दिवे तर आवर्जून आहेत तेच वापरावेत. मात्र खराब झालेले दिवे तात्काळ नवीन करून घ्यावेत.
2 / 6
दोन निरंजन लावत असाल तर तेलाची वेगळी नी तुपाची वेगळी राहील याची काळजी घ्यावी. तेलतुपाचे एकत्र दिवे तर अगदी चुकूनही लावू नये.
3 / 6
देवपूजा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणं, वस्तू वा साधने तुटकी फुटकी, खराब, चिरा पडलेली नसावीत.तसेच ती शक्यतो आहेत तीच वर्षानुवर्षे वापरावीत.दिवे तर आवर्जून आहेत तेच वापरावेत. मात्र खराब झालेले दिवे तात्काळ नवीन करून घ्यावेत.
4 / 6
नित्यनेमाने दिवे लावतांना ते पितळी किंवा चांदीचे असावेत. अनेकांकडे सोन्याचे दिवेसुद्धा असतात. परिस्थिती असल्यास सोन्या-चांदीचे दिवे अवश्य बनवून घ्यावेत. अनेकांकडे नंदादीप नसतो. आर्थिक परिस्थिती सुधारली असल्यास अत्यंत चांगला नंदादीप घडवून घ्यावा. देवासमोर चोवीस तास तेलाचा दिवा अगदी हवाच हवा (केवळ परिस्थिती नसल्यास क्षम्य आहे). समई लावल्यास अजूनच उत्तम मात्र आता जागेअभावी समई ठेवणं कितपत शक्य असेल ते बघूनच समई अथवा नंदादीप याचा निर्णय करावा. कारण समई कलंडण्याची शक्यता जास्त असते, काजळी काढणं, ज्योत सारखी ठेवणं आणि तेल ओघळू न देणं हेसुद्धा कमालीचं संयम बघणारं असतं. नंदादीप तुलनेत कमी जागेत, कमी देखभालीचा आणि तेल ओघळण्याचा विषयच नसल्याने एकूणच सोपा व पर्यायाने सुलभ ठरतो.
5 / 6
नंदादीप असो व समई आठवड्यात एकदा ठरवून एका वारी स्वच्छ घासून पुसून वात व तेल पूर्ण नवीन घालणे गरजेचे असते.
6 / 6
आजपासून सुरू होणाऱ्या अधिकमासात दीपदान, जाळी असलेल्या पक्वान्नाचे (बत्तासे/ अनारसे) व ऐपतीप्रमाणे एखादी वस्तू 'ससंकल्प' इष्टदेवतेस व ब्राह्मणास अवश्य दान करावे.
टॅग्स :Adhik Maasअधिक महिना