adhik maas 2023 numerology these 7 birth date people get benefits and success in adhik mahina 2023
अधिक मास: ‘या’ ७ मूलांकांना शुभ-लाभ, सुख-समृद्धी; अपार धनलाभ योग, भरभराट अन् भाग्योदय काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 3:21 PM1 / 12Numerology: मराठी वर्षातील सर्वाधिक महत्त्वाचा सात्त्विक काळ असलेल्या चातुर्मासातील विशेष अधिक मास सुरू आहे. सन २०२३ मधील श्रावण अधिक मास आहे. अधिक मासात लक्ष्मी-नारायण शुभ योग, खप्पर तसेच शनी-राहुचा प्रतिकूल योग जुळून येत आहे. 2 / 12बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. तर, गुरु, राहू, हर्षल मेष राशीत रवी आणि बुध कर्क राशीत बुध सिंह राशीत असून, मंगळ आणि शुक्र यांच्याशी युती करेल. केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. 3 / 12ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ग्रहांच्या गोचराचा मूलांकांवरही प्रभाव असतो, असे सांगितले जाते. अधिक मासात या आगामी काळातील ग्रहस्थितीचा कोणत्या मूलांकांना फायदा होऊ शकेल? ते जाणून घेऊया...4 / 12ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आर्थिक बाबतीत आगामी काळ शुभ राहील. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. गुंतवणुकीतून दिलासा मिळू शकेल. अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसून येईल. लव्ह लाइफमध्ये सुख-समृद्धीचे योग येतील. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल.5 / 12ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी उत्तम परिस्थिती निर्माण होत आहे. कामे, प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक दृष्टीकोनातूनही चांगले लाभ दिसत असून, गुंतवणुकीतून यश मिळेल. भागीदारीत केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल. 6 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कोणताही नवीन प्रकल्प अपेक्षित परिणाम देऊ शकतील. मन समाधानी राहील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आर्थिक खर्च जास्त होऊ शकतो. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. घरातील कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करण्यास भावंडे मदत करू शकतील. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकेल.7 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कामाच्या ठिकाणी बरेच बदल होतील. जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल. आर्थिक बाबींमध्ये अचानक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढू शकतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 8 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकाल. आर्थिक बाबतीत प्रतिकूल काळ असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि शांतात आणू शकते.9 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यातून मान-सन्मान वाढेल. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल. कौतुक होईल. आर्थिक बाबतीत मन थोडे निराश असले तरी घरगुती खर्च जास्त असल्याने आर्थिक परिस्थिती डळमळीत होऊ शकते. अनावश्यक वादविवाद टाळावे. काही कौटुंबिक प्रकरणामुळे मन अस्वस्थ होऊ शकते.10 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. कामाच्या ठिकाणी पद आणि प्रभाव वाढू शकेल. सहकाऱ्यांशी चांगला समन्वय असल्याने कामे यशस्वी होतील. आर्थिक बाबतीतही यश मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. यशाचा मार्ग खुला होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. 11 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहील. आर्थिक प्रगतीचा योग जुळून येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मन एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी राहू शकते. लव्ह लाइफमध्ये प्रेम हळूहळू मजबूत होईल. कालांतराने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात शुभ परिणाम मिळतील. केलेली मेहनत यशकारक ठरू शकेल.12 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. जितके विचारपूर्वक निर्णय घ्याल तितके यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहील. लाभ होईल. सुख-समृद्धीचा योग जुळून येईल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications