शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अधिक मास: शिवरात्रीला अद्भूत संयोग, ‘हे’ ५ उपाय करा; महादेव प्रसन्न होतील, लाभच लाभ मिळतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 11:50 AM

1 / 9
श्रावण अधिक मास सुरू आहे. काही दिवसांनी अधिक मासाची सांगता होत आहे. अधिक श्रावण समाप्त झाल्यानंतर निज श्रावण महिना सुरू होईल. श्रावणात केली जाणारी व्रत-वैकल्ये, सण-उत्सव निज श्रावण महिन्यात साजरे केले जातील.
2 / 9
१४ ऑगस्ट रोजी अधिक मासातील शिवरात्री आहे. अधिक मासातील शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अद्भूत योग जुळून येत आहे. या शिवरात्रीला भगवान शंकराची उपासना केल्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. अधिक श्रावण मासातील शिवरात्रीला काही उपाय करून तुम्ही तुमच्या अडचणी दूर करू शकता, असे सांगितले जाते.
3 / 9
शिवरात्रीचे व्रत हे महादेवांच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. विशेष म्हणजे अधिक मासातील ही शिवरात्री सोमवारी आल्यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी रुद्राभिषेक, महादेवांची विशेष उपासना, पूजन, नामस्मरण पुण्य-फलदायी मानले गेले आहे.
4 / 9
खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल. पैशाची सातत्याने कमतरता भासत असेल तर अधिक मासाच्या शिवरात्रीला घरात पारद शिवलिंगाची स्थापना करावी. पारद शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकेल, उत्पन्न वाढू लागेल, असे म्हटले जाते.
5 / 9
मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रावणाच्या शिवरात्रीला हा उपाय केल्यास भगवान शिवशंकर खूप प्रसन्न होतील, असे सांगितले जाते. २१ बेलपत्र घ्या. ते चांगले धुऊन स्वच्छ करा. बेलपत्र तुटलेले किंवा दुभंगलेले नसावे. पूजेमध्ये या पानांचा वापर करण्यापूर्वी अत्तरमिश्रित पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा. यानंतर या पानांवर पिवळ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहा. त्यानंतर शिवमंत्राचा जप करताना प्रत्येक बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा. या उपायाने तुमची प्रार्थना महादेवांपर्यंत लवकर पोहोचेल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सांगितले जाते.
6 / 9
चांगली कमाई होऊनही घरात बचत होत नसेल किंवा बरकत येत नसेल, तर अधिक श्रावणातील शिवरात्रीला धोत्र्याचे फळ अर्पण करावे. अशाने घरात पैशांची बचत होऊ लागते. पूजेनंतर ते धोत्र्याचे फळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने घरात पैसे वाचू लागतील आणि थकबाकी, अडलेले पैसे मिळतील, असे म्हटले जाते.
7 / 9
वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी हा उपाय करू शकता. तुम्हाला असे करायचे आहे की, शिवरात्रीच्या दिवशी गायीच्या दुधात केशर मिसळावे आणि या दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा. यासोबत ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनात शांती प्रस्थापित होईल. महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल, असे म्हटले जाते.
8 / 9
याशिवाय शिवरात्रीला महादेवांचे विशेष पूजन, नामस्मरण, रुद्राभिषेक, विविध प्रकारच्या स्तोत्रांचे पठण, श्रवण केल्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात शिवशंकरांची उपासना पुण्यफलदायी मानली गेली आहे.
9 / 9
- सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाShravan Specialश्रावण स्पेशलspiritualअध्यात्मिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम