शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Adhik Maas Puja 2023: देवपूजेसाठी फुलं निवडताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळा आणि दिलेल्या चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:15 AM

1 / 5
देवपूजा करण्यासाठी शक्यतो फुलं ताजी, सुवासिक ( गोकर्ण सुवासिक नसला तरीही आवर्जून वाहतात), तजेलदार आणि मोहक अशी वापरावीत. सडकी, कुजलेली, गळून गेलेली फुलं अजिबात वाहू नये.
2 / 5
शक्यतो विलायती, हायब्रीड फुलं वापरू नयेत. घरच्या अंगणातली फुलं वापरावीत. तशी सोय नसेल तर विकतच्या फुलांचा वापर करावा. ओळखीतल्या फुलवाल्याकडून फुलं घ्यावीत, जेणेकरून वाहिलेली, वापरलेली फुलं मिळण्याची शक्यता राहत नाही.
3 / 5
विसंगती निर्माण होईल अशी फुलं देवाला वाहू नये. उदा. जास्वंदी शंकराला वाहू नये. तेरडा, सदाफुली कोणत्याच देवतेला वाहू नये.
4 / 5
उलटी फुलं अगदी चुकूनही देवाला वाहू नयेत. देठ देवाकडे करूनच फुलं वाहावीत. देवतेच्या डोळ्यांवर फुलं/ पाकळ्या येतील अश्याप्रकारे सुद्धा फुलं वाहू नयेत.
5 / 5
हार घालणार असाल तर त्यामध्ये प्लॅस्टिक, थर्मोकोल असणार नाही ह्याची खात्री करून घ्यावी. ताजी फुलं मिळाली नाहीत तर शेवंती, झेंडू वगैरे टिकाऊ पण चांगली फुलं घ्यावीत. तीही न मिळाल्यास योग्य प्रकारे अक्षता व अल्कोहोल नसलेलं उत्तम दर्जाचे अत्तर वापरावे.
टॅग्स :Adhik Maasअधिक महिना