शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ वर्षांनी चतुर्ग्रही योग: ८ राशींना उत्कर्षाची संधी, उत्तम धनप्राप्ती; उज्ज्वल यश-प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 7:07 AM

1 / 15
धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषदृष्ट्या एप्रिल महिना अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. तसेच या महिन्यात सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण मेष राशीत असणार आहे. या ग्रहणावेळी सूर्य अश्विनी नक्षत्रात असेल. विशेष म्हणजे मेष राशीत दुर्मिळ आणि शुभ मानला गेलेला चतुर्ग्रही योग जुळून येत आहे.
2 / 15
मेष राशीत आताच्या घडीला राहु आणि शुक्र विराजमान आहेत. ३१ मार्च रोजी बुधाचा मेष राशीत प्रवेश झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बुध-राहु-शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून येईल. यानंतर शुक्र वृषभ राशीत विराजमान होईल. नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध-सूर्याचा बुधादित्य योग आणि बुध-सूर्य-राहुचा त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल.
3 / 15
नवग्रहांचा गुरु बृहस्पति ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. राहुशी गुरुची युती होऊन गुरु चांडाळ योग जुळून येईल. गुरु आगमनानंतर मेष राशीत गुरु, सूर्य, बुध आणि राहुचा चतुर्ग्रही योग जुळून येऊ शकेल. मेष राशीतील या चतुर्ग्रही योग काही राशींना उत्तम संधीचा तसेच लाभदायक ठरू शकेल, तर काही राशींना या योग काळात सावधगिरी बाळगावी लागू शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...
4 / 15
मेष राशीत गुरु, सूर्य, बुध आणि राहुचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. या राशीच्या व्यक्तींना नवीन ऊर्जेचा अनुभव घेऊ शकाल. जीवनातही बदल घडून येईल. नवीन संधी मिळू शकतात. करिअर आणि आर्थिक बाबतीत जोखीम पत्करली तर यश मिळू शकेल. ध्येय साध्य करता येऊ शकतील. मात्र, वैयक्तिक जीवनात तुम्हाला नातेसंबंधांबाबत काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्या.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. भविष्यातील उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. आर्थिकदृष्ट्याकाही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळावेत. भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटू शकते. संवाद महत्त्वाचा आहे आणि आपल्या प्रियजनांशी प्रामाणिक आणि खुले संभाषण करणे महत्त्वाचे आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींची चतुर्ग्रही योगाचा काळात वैयक्तिक प्रगती होऊ शकेल. करिअरच्या दृष्टीने विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. एखादे नवीन कौशल्य शिकणे उपयुक्त ठरू शकेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ काहीसा कठीण जाऊ शकतो. जवळच्या लोकांशी मतभेद होऊ शकतील. संवादाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडू शकतो.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ यश देणारा ठरू शकेल. करिअरमध्ये तणाव जाणवू शकतो. परंतु एकाग्र होऊन काम करणे महत्त्वाचे ठरू शकेल. वैयक्तिक संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुमच्या समजूतदारपणाचे कौतुक होऊ शकेल. अविवाहित असाल, विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ अनुकूल ठरू शकेल. करिअर किंवा आर्थिक आघाडीवर काही बदल अनुभवता येऊ शकतील. अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा पदोन्नती मिळू शकते. आर्थिक व्यवहार हुशारीने करावेत. जास्त खर्च टाळावे. मित्र आणि प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवता. नवीन दिनचर्या आखणे आणि त्याचे पालन करणे उपयुक्त ठरू शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगती कराल. कौशल्ये, अधिक जबाबदारी घेण्याच्या क्षमतेचे बॉस आणि सहकारी यांच्याकडून कौतुक होऊ शकेल. विकासासाठी नवीन संधी मिळतील. अनुकूल वेळेचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोडीदाराशी किंवा मित्रांशी काही वाद होऊ शकतात.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ सकारात्मक ठरू शकेल. कौशल्ये, क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच नवीन जबाबदाऱ्या किंवा आव्हानात्मक प्रकल्प स्वीकारण्यासाठी ही चांगली वेळ आहे. बजेटची काळजी घ्यावी. भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी पावले उचलण्यासाठी ही चांगली वेळ आहे. जोडीदार आणि नातेवाइकांची चांगल्या संवादातून नातेसंबंध दृढ करू शकाल.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ महत्त्वाचा ठरू शकेल. कौशल्ये दाखवण्याची नवीन संधी मिळू शकेल. मात्र, ध्येयांवर टिकून राहणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तींच्या सूचनांवर विचार करणे हिताचे ठरू शकेल. इतरांकडून शिकणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक जोखीम घेणे टाळा. पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये नातेसंबंध दृढ करण्याचा आणि संपर्क वाढवण्यावर भर देण्याचा काळ आहे.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. जोखीम घेतल्यास अनपेक्षित यश मिळू शकेल. नवीन कौशल्ये विकसित करणे आणि ज्ञान वाढविण्यासाठी ही चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत प्रामाणिक राहा. जवळच्या व्यक्तींशी चांगला संपर्क ठेवावा. स्वत:ची काळजी घ्यावी.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ चांगला ठरू शकेल. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. ग्रहमान अनुकूल आहेत. सकारात्मक बदल प्रगतीच्या संधी मिळवून देऊ शकेल. नोकरी, बढती किंवा पदोन्नतीची ऑफर दिली जाऊ शकते. कौशल्ये दाखवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कामाला प्राधान्य द्यावे. आर्थिक स्थिती स्थिर राहू शकेल. उधळपट्टी आणि अनावश्यक खर्च टाळा. दीर्घकालीन बचत आणि गुंतवणूक करण्यावर भर द्यावा.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनपेक्षित खर्च किंवा आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नाविन्यपूर्ण आणि कल्पक स्वभाव तुम्हाला सर्जनशील उपाय शोधण्यास सक्षम करेल. करिअरची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा नवीन प्रोजेक्ट हाताळण्यासाठी ही चांगली वेळ आहे. नवीन मित्र होऊ शकतील. जनसंपर्क वाढवण्यासाठी चांगला काळ आहे.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचा काळ अनुकूल ठरू शकेल. करिअर नव्या दिशेने नेण्याची संधी मिळू शकते. मित्र तसेच प्रियजनांच्या भेटी घडू शकतील. संपर्क वाढू शकेल. वैयक्तिक आयुष्यात चांगल्या संधी मिळू शकतील. लोकांच्या गरजा आणि भावना समजून घेण्यास सक्षम असाल. जोडीदाराशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधू शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य