शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३० वर्षांनी शुभ योग: ६ राशींना लाभ, कामात यश, अडकलेले पैसे येतील; पिता-पुत्र कृपा करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 7:07 AM

1 / 10
सन २०२४ च्या जानेवारी महिन्यात ग्रहांचे अद्भूत, दुर्मिळ असे शुभ योग जुळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आणखी एका शुभ योगाची भर पडली आहे. नवग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत विराजमान झाला आहे. तर नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. काही पौराणिक कथांनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र मानले जातात.
2 / 10
मकरसंक्रांतीच्या दिवशी शनी कुंभ राशीत होता. ३० वर्षांनी असा योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. तर यामुळे शश नाम राजयोग निर्माण झाला आहे. तसेच सूर्य मकर राशीत असून, लगेच पुढील रास असलेल्या कुंभ राशीत शनी विराजमान आहे. यामुळे सूर्य आणि शनी यांचा एकमेकांपासून दुसऱ्या तसेच बाराव्या स्थानी आहे. याने द्वि द्वादश नामक योग जुळून येत आहे.
3 / 10
तसेच ७७ वर्षांनी वरियन नामक दुर्लभ योगही जुळून येत आहे. शनी आणि सूर्य या पिता-पुत्रांचा हा शुभ योग ६ राशींसाठी विशेष फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या काळात शनी आणि सूर्याची विशेष कृपा या राशींवर राहू शकते. अपूर्ण कामे सहजतेने पूर्ण होऊ शकतात, आर्थिक आघाडीवर फायदा होऊ शकतो, भाग्याची उत्तम साथ मिळू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 10
मेष राशीच्या व्यक्तींना शुभ योगाचा लाभ मिळेल. सूर्य आणि शनिदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होतील. कामात यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नवीन संधी मिळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शुभ योगामुळे यशाच्या शिखरावर पोहोचाल. प्रभावशाली लोकांची भेट होईल. समस्यांचे निराकरण मिळू शकेल. कठोर परिश्रमाने ध्येय साध्य कराल.
5 / 10
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुभ योगाचा फायदा मिळेल. सूर्य आणि शनिदेवाच्या कृपेने अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर चांगला नफा मिळेल. जुन्या कर्जातूनही सुटका मिळेल. व्यावसायिकांवर सूर्य आणि शनीची कृपा असेल. व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे. व्यवसायाची विश्वासार्हता वाढेल. नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर इच्छा पूर्ण होईल. आई-वडिलांचा आशिर्वाद मिळेल.
6 / 10
सिंह राशीच्या व्यक्तींना शुभ योगाचा लाभ मिळेल. सूर्य आणि शनिदेवाच्या आशिर्वादाने मालमत्ता खरेदी करायची असेल तर अनेक चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाच्या इतर स्रोतांची माहिती मिळेल. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. पालकांचा आशिर्वादही राहील.
7 / 10
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुभ योगाचा लाभ मिळेल. सूर्य आणि शनिदेवाच्या आशिर्वादाने प्रगतीच्या चांगल्या संधी मिळून कुटुंबात सुख-शांती नांदेल. परदेशात शिक्षण घ्यायचे असेल किंवा परदेशात प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर अनेक चांगल्या संधी मिळतील. समस्या हळूहळू संपू लागतील. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. नवीन स्थिती निर्माण कराल. नोकरदारांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. कौटुंबिक जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी राहील. मन प्रसन्न राहील.
8 / 10
मकर राशीच्या व्यक्तींच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. सामाजिक वर्तुळ वाढेल. सूर्य आणि शनिदेवाच्या आशिर्वादाने अशी प्रगती साधू शकाल ज्याची अपेक्षाही नव्हती. हळूहळू सर्व कामे सहज होऊ लागतील. जोडीदारासोबत एकत्र मिळून कोणतीही संयुक्त मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदारांना परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते.
9 / 10
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुभ योगाचा लाभ होईल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळविण्यात यशस्वी होऊ शकाल. नवीन व्यावसायिक सौदे करण्यात यश मिळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारांचे सहकार्य मिळेल. सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा अडचणीशिवाय पूर्ण होऊ लागतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.
10 / 10
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य