शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 7:07 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात अतिशय विशेष ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्राने राशीपरिवर्तन केल्यानंतर आता नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होत आहे. सुमारे १४१ दिवसांपूर्वी शनी कुंभ राशीत वक्री झाला होता. तो आता ०४ नोव्हेंबर रोजी कुंभ राशीत मार्गी झाला आहे.
2 / 15
शनी ग्रहाचे मार्गी होणे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. सन २०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत विराजमान असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आताच्या घडीला मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तर कुंभ राशीचा साडेसातीचा मधला किंवा दुसरा टप्पा सुरू आहे. याशिवाय मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मकर राशीची साडेसाती संपेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
पुढील जून २०२४ पर्यंत शनी कुंभ राशीत मार्गी चलनाने विराजमान असणार आहे. या कालावधीत शनीची काही राशींवर अपार दृष्टी असेल, काही राशींना मालामाल लाभ होऊ शकतील, आगामी काळ शानदार जाऊ शकेल, तर काही राशींसाठी काहीसा संमिश्र ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 15
मेष: बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक चांगले निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. हे निर्णय हिताचे ठरतील. करिअरमध्ये शनी खूप साथ देईल. पदोन्नती आणि यश मिळेल. एवढेच नाही तर या काळात सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभही मिळतील. व्यावसायिकांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. शक्य असल्यास 'ॐ बुधाय नमः' या मंत्राचा दररोज ४१ वेळा जप करावा.
5 / 15
वृषभ: नशीब पूर्ण साथ देईल. करिअरच्या दृष्टिकोनातून या काळात चांगले समाधान मिळेल. जे व्यवसाय करतात, त्यांना या काळात विशेष डील मिळू शकते. शनीच्या मार्गी झाल्याने धनप्राप्ती आणि धनसंचय करण्यात यश मिळेल. या काळात बचतही चांगली होईल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबियांशी संबंध अनुकूल असतील. शक्य असेल तर 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा दररोज ४१ वेळा जप करा.
6 / 15
मिथुन: शनीचे कुंभ राशीत मार्गी होणे काहीसे संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तरच यश मिळेल. व्यवसायिकांना या काळात भागीदारांकडून पूर्ण सहकार्य न मिळाल्याने काही नुकसान सहन करावे लागू शकते. जोडीदाराशी संबंध थोडेसे बिघडू शकतात. समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकेल. बचतीच्या योजना यशस्वी होतीलच असे नाही. तब्येतीची काळजी घ्या. यथाशक्ती दानधर्म करावा.
7 / 15
कर्क: अपेक्षित यश आणि लाभ मिळणार नाही. जवळच्या लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी यश मिळू शकेल. नुकसान सहन करावे लागू शकते. आर्थिक स्थिती बिघडू शकते. जोडीदारासोबत चांगले नाते निर्माण करण्यात अयशस्वी होऊ शकता. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शक्य असेल तर, शनिवारी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करून पाणी अर्पण करावे.
8 / 15
सिंह: करिअरमध्ये खूप चढ-उतार येऊ शकतात. वैयक्तिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. जे काही काम कराल त्यात समाधान न मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर अयशस्वी होऊ शकता. व्यावसायिकांचे भागीदारांशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकेल. कौटुंबिक जीवनातही संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. लोक चिथावण्याचा प्रयत्न करतील, परंतु संयम गमावू नका. संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा दररोज १०८ वेळा जप करावा.
9 / 15
कन्या: आगामी काळ प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. या काळात नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी उच्चस्तरीय लाभ मिळतील. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आयुष्यात आनंदी काळ येईल. परकीय स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. शक्य असेल तर सोमवारी महादेव शिवशंकाराचे यज्ञ/हवन करावे.
10 / 15
तूळ: जीवनात समाधान मिळेल. मोठी कामे सहज पूर्ण करू शकता. नफा मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रमोशन मिळण्याचे संकेत मिळतील. परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळण्यात यश मिळेल. व्यवसायातही अनेक महत्त्वाचे बदल दिसू शकतात जे फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी वेळ अनुकूल राहील. शक्य असेल तर जून २०२४ पर्यंत नियमितपणे दर गुरुवारी गुरु ग्रहाचे पूजन करावे.
11 / 15
वृश्चिक: धावपळ, दगदग होऊ शकेल. आराम मिळेलच असे नाही. खर्चही लक्षणीय वाढू शकतात. कौटुंबिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मध्यम फायदा मिळेल. व्यावसायिकांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. आर्थिक स्थितीही मध्यम राहील. नवीन योजनांमध्ये मोठी गुंतवणूक न करणे हिताचे ठरू शकेल. अपेक्षित लाभ, नफा मिळेलच असे नाही. कुटुंबातील कोणाशी तरी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. शक्य असेल तर यथाशक्ती शनि स्तोत्राचा पठण किंवा श्रवण करावे.
12 / 15
धनु: कौटुंबिक, आर्थिक आघाडी आणि वैयक्तिक विकासात अनुकूल परिणाम मिळतील. परदेशात करिअर करण्याच्या काही संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कामगिरीवर खूप खुश असतील. वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. एक वेगळीच हिंमत पाहायला मिळेल. शक्य असेल तर योग्य मार्गदर्शन घेऊन शनी यंत्र स्थापन करा. दररोज शनी मंत्रांचा जप करा.
13 / 15
मकर: धनलाभ होऊ शकेल. जीवनात अधिक पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. नशीब चांगली साथ देईल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. जीवनात आनंद आणि समाधान लाभेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम कराल त्याबद्दल खूप आदर मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात चांगला नफा मिळू शकेल. चांगला परतावाही मिळेल. करिअरमध्ये कोणतेही काम कराल तर चांगले आर्थिक लाभ मिळतील. शक्य असेल तर शनिवारी घरात शमीचे रोप लावा.
14 / 15
कुंभ: आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी कामगिरी काही विशेष असणार नाही. मेहनतीचे कौतुक होईल अशी अपेक्षा करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच बचत चांगली होऊ शकेल. शक्य असेल तर शक्य तितकी ज्येष्ठांची सेवा करावी.
15 / 15
मीन: संमिश्र परिणाम मिळू शकतील. नफा झाला तरी खर्चही खूप वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिक दबाव जाणवेल. अधिकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते शक्य होणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला नफा मिळू शकतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील असे नाही. जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शक्य असेल तर यथाशक्ती शनी स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य