शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग: पंचग्रही युतीचा ‘या’ ६ राशींना राजयोग; सर्वोत्तम लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:36 AM

1 / 12
धार्मिक, सांस्कृतिक, खगोलीय आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यातील आगमी काळ अतिशय शुभ, अद्भूत तसेच दुर्मिळ योगांचा ठरणारा असेल, असे सांगितले जात आहे. आगामी काळात सूर्यग्रहण, गुरुपालट, अक्षय्य तृतीया यांसह अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहेत.
2 / 12
सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी झाल्यानंतर ग्रहांचा अत्यंत शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. हा एक राजयोग असून, तब्बल ५०० वर्षांनी असा दुर्मिळ योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. या योगाचे नाव केदार योग आहे.
3 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, चार स्थानात ७ ग्रह विराजमान असतात, तेव्हा केदार नामक राजयोग जुळून येतो. आताच्या घडीला असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. कुंभ राशीत शनी आहे. मीन राशीत गुरु आहे. सूर्यग्रहणानंतर आणि अक्षय्य तृतीयेच्या आधी म्हणजेच २१ एप्रिल रोजी गुरुपालट होणार आहे. गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे.
4 / 12
यासह मेष राशीत नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध, छायाग्रह राहु आणि युरेनस आहेत. तर वृषभ राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान चंद्र वृषभ राशीत असेल. त्यामुळे कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतील ग्रहांचा मेळा असणार आहे. त्यामुळे केदार नामक राजयोग जुळून येत आहे.
5 / 12
विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेला केवळ मेष राशीत पंचग्रह योग जुळून येत आहे. या दिवशी मेष राशीत गुरु, सूर्य, बुध, राहु आणि युरेनस हे पाच ग्रह विराजमान असणार आहेत. एकूणच अक्षय्य तृतीयेला जुळून येत असलेल्या शुभ योगांचा ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ, संधी, फायदा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत, त्या राशी? जाणून घेऊया...
6 / 12
मेष राशीत अक्षय्य तृतीयेला पंचग्रही योग जुळून येत आहे. अक्षय्य तृतीयेला चहूबाजूंनी लाभ होऊ शकेल. प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्य कराल. परोपकार आणि शुभ कार्यात सहभागी होऊ शकता, ज्याचे उत्तम लाभ मिळू शकतील. पैसा आणि सोने प्राप्तीचा योगायोग जुळून येऊ शकेल.
7 / 12
वृषभ राशीच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचे शुभ योग अनुकूल ठरू शकतील. राशीस्वामी शुक्र विराजमान असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना राजयोगाचे लाभ मिळू शकतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वस्त्र, दागिने आणि भौतिक सुखाचा लाभ मिळू शकेल. कला आणि सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या कलेचे कौतुक, लाभ मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात स्नेह आणि प्रेम राहील. तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते.
8 / 12
कर्क राशीच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा काळ धनसमृद्धीकारक ठरू शकतो. सुख, समृद्धीचा योग जुळून येऊ शकेल. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. आर्थिक लाभाने मन प्रसन्न राहू शकेल. दागिने मिळू शकतात. चांदी आणि हिरा तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर असू ठरू शकतो.
9 / 12
सिंह राशीच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा काळ शुभ फलदायी ठरू शकेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य उच्च रास असलेल्या मेष राशीत विराजमान आहे. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. दागिने खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. घरातील ज्येष्ठांचा शुभाशिर्वाद आणि पाठिंबा मिळू शकेल.
10 / 12
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा काळ लाभदायक ठरू शकेल. वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतील. घर आणि जमिनीत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठीही अक्षय्य तृतीयेचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. चंद्र आणि शुक्राचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल.व्यवसायातही चांगला नफा मिळू शकतो. मातृपक्षाकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. प्रवासात शुभ जुळून येऊ शकतील.
11 / 12
धनु राशीच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेचा काळ शुभ ठरू शकेल. धनु राशीच्या तिसऱ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी शुभ केदार योग जुळून येत आहे. जमीन, घर, मालमत्तेत केलेली गुंतवणूक शुभ फलदायी ठरू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. खर्चांवर नियंत्रण मिळवणे हिताचे ठरू शकेल.
12 / 12
अक्षय्य तृतीयेच्या आधी सूर्यग्रहणाला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. मेष राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहेत. याचाही शुभ प्रभाव पाहायला मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य