शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६१७ वर्षांनी दुर्मिळ योग: ‘या’ ४ राशींना सर्वोत्तम, गुंतवणुकीतून फायदा; ४ ग्रह शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 2:45 PM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग जुळून येत असतात. फेब्रुवारी महिन्यातील ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे अद्भूत पण दुर्मिळ शुभ योग जुळून आले आहेत. नवग्रहातील चार महत्त्वांच्या ग्रहांच्या एकमेकांच्या संयोगमुळे हे योग जुळून आले आहेत. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
कुंभ आणि मीन राशीत हे दुर्मिळ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. आताच्या घडीला कुंभ राशीत सूर्य आणि शनी विराजमान आहेत. पौराणिक मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र मानले गेले आहेत. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार, ते शत्रू ग्रह मानले गेले आहेत. परंतु, कुंभ राशीत शनी अस्तंगत असल्यामुळे शनीचा प्रभाव फारसा पाहायला मिळणार नाही, असेही म्हटले जात आहे.
3 / 9
तर मीन राशीत आताच्या घडीला शुक्र आणि गुरु विराजमान आहेत. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. या राशीत तो अधिक चांगली शुभ फले देतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, शुक्र आणि गुरु शत्रू ग्रह मानले गेले आहेत.
4 / 9
कुंभ राशीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेल्या शनीचा शश नामक राजयोग जुळून येत आहे. तसेच कुंभ राशीत सूर्य आणि शनीचा युती योग जुळून आला आहे. मीन राशीतील शुक्राचा मालव्य राजयोग जुळून येत आहे. तसेच गुरुच्या प्रभावामुळे हंस नामक राजयोग जुळून येत आहे.
5 / 9
सूर्य, गुरु, शुक्र व शनीच्या संगमाने तब्बल ६१७ वर्षांनी अत्यंत दुर्मिळ असे तीन शुभयोग तयार झाले आहेत. या दुर्मिळ योगांचा चार राशीच्या व्यक्तींना अपार लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक यांसारख्या क्षेत्रात शुभ परिणाम मिळू शकतात, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरु व शुक्र ग्रहाच्या प्रभावाने हंस व मालव्य या दोन राजयोगांचा लाभ मिळू शकतो. आपल्याला येत्या काळात कामात प्रगतीची संधी आहे. बेरोजगारांना लवकरच नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचे येत्या काळात चीज होऊ शकेल. व्यावसायिकांना लवकरच नवीन आर्थिक स्रोत लाभू शकतात. नोकरदार मंडळींची कामाची व्याप्ती वाढू शकेल. आगामी काळात पगारवाढीची शक्यता आहे.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग शुभ फलदायी सिद्ध होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड पैसे मिळू शकतात. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. व्यापार वाढीची संधी आहे. जोडीदारासह आपल्याला परदेशवारीची संधी आहे.
8 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना दुर्मिळ योग लाभदायक ठरू शकतात. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू मजबूत होण्याची संधी आहे. वर्षभर धनलाभाची संधी आहे. आईसह तुमचे नाते सुधारू शकते. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना कर्मानुसार फळे मिळू शकतात.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना शश महापुरुष राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आरोग्यात सुधारणा होऊ शकेल. आत्मविश्वास येत्या काळात प्रचंड वाढू शकतो. जोडीदारासह नातेसंबंध दृढ होऊ शकतात. जोडीदाराकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. शक्य होईल तितकी गुंतवणूक करण्यावर भर द्यावा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह ताळमेळ बसवावा लागेल. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य