शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Akshaya Tritiya 2023 Numerology: अक्षय्य तृतीया: ‘या’ ७ मूलांकांना लाभदायक, धनप्राप्तीचे योग; कामात यश, बिझनेसमध्ये प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 6:30 AM

1 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेला अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. (Akshaya Tritiya 2023 Numerology)
2 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह स्वराशीतून म्हणजेच मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. याशिवाय गुरु अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करत आहे. अक्षय्य तृतीयेला मेष राशीत पंचग्रही शुभ योग जुळून येत आहे. तसेच तब्बल ५०० वर्षांनी केदार नामक राजयोग जुळून येत आहे.
3 / 12
अक्षय्य तृतीयेला जुळून येत असलेल्या शुभ योगांचा राशींप्रमाणे मूलांकांवरही शुभ प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे. काही मूलांकांच्या व्यक्तींना आर्थिक आघाडीवर लाभ होऊ शकेल, तर काहींना नोकरीत यश, प्रगती तसेच व्यवसायात फायदा होऊ शकेल. अक्षय्य तृतीयेचा तुमच्या मूलांकावर असा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आगामी काळात चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. शिक्षण आणि तांदूळ उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला फायदा होऊ शकेल. सतर्क राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. आगामी काळात आर्थिक आघाडीवर लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. मित्रांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायिक निर्णय घेताना योग्य विचार करावा. दाम्पत्य जीवनात काही खटके उडू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घेणे हिताचे ठरू शकेल.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून कामे पार पाडू शकला तरच कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखकारक ठरू शकेल. शैक्षणिक संस्थांशी संबंधित कामात यश मिळू शकेल. नवीन गुंतवणूक करू नये किंवा पैसे उधार देऊ नये. अन्यथा धनहानी होऊ शकते.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कामाच्या ठिकाणी कौतूक होऊ शकेल. प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. कामे गतीने करण्यास प्राधान्य द्यावे. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. आर्थिक लाभाशी संबंधित चांगल्या बातम्याही मिळू शकतील. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होऊ शकते. अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहू शकतील.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आर्थिक आघाडीवर लाभ मिळू शकते. मन प्रसन्न होऊ शकेल. मित्रांशी मतभेद होऊ शकतात. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होऊ शकेल. पदोन्नतीचीही शक्यता निर्माण होऊ शकेल. कपड्यांशी संबंधित कामात यश मिळू शकेल.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. आगामी काळ लाभदायक ठरू शकेल. व्यापारी वर्गाला लाभ मिळू शकेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. अन्यथा मोठी रक्कम अडकून पडू शकते. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना इच्छित नोकरी मिळू शकेल. प्रयत्नांना गती येईल. भावंडांशी मतभेद होऊ शकतात. बोलताना विचारपूर्वक बोला. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे.कामाच्या ठिकाणी क्षमतांचा लाभ मिळेल. आर्थिक आघाडी आणि पदाचे फायदे मिळू शकतील. वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आगामी काळात नशिबाची साथ मिळू शकेल. आर्थिक लाभासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापार-व्यवसायाशी संबंधितांना विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात. ग्रहबळ मिळू शकेल.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. गुंतवणुकीशी संबंधित नवीन माहिती मिळेल. जे काम खूप कठीण वाटत होते, ते प्रयत्नांनंतर लवकर पूर्ण होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा काळ लाभदायक ठरु शकेल. नोकरदारांचे कार्यालयात कौतुक होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीयाnumerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष